Pakistan Crisis : शाहबाज शरीफ होणार पाकिस्तानचे पीएम; चीनच्या माध्यमांनी केलं सूचक वक्तव्य
Pakistan New PM : इम्रान खान यांची सत्ता गेल्यानं चीन खूश आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी शाहबाज शरीफ पंतप्रधान होण्याच्या शक्यतेवर आनंद व्यक्त करत म्हटलं, आता दोन्ही देशांमधील संबंध अधिक चांगले होतील.

Shahbaz Sharif to be New PM of Pakistan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी आपल्या कार्यकाळात चीनसोबत (China) सर्वाधिक जवळीक वाढवली. मात्र, हाच चीन आज इम्रान खान यांच्या सत्तेतून बाहेर पडल्याबद्दल आनंद व्यक्त करत आहे. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी रविवारी इम्रान खान (Imran Khan) यांना सत्तेवरुन हटवल्यानंतर शाहबाज शरीफ (Shahbaz Sharis)) नवीन पंतप्रधान होण्याच्या शक्यतेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. चीनी माध्यमांनी म्हटलं आहे की, आता चीन (China) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) संबंध इम्रान खान यांच्या कार्यकाळापेक्षाही चांगले होऊ शकतील.
चीनसोबतच्या संबंधांवर कोणताही परिणाम नाही
चीन सरकारच्या 'ग्लोबल टाईम्स'मधील (Global Times) एका लेखात म्हटले आहे की, सोमवारी संसदेच्या बैठकीनंतर तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ हे सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. चीन आणि पाकिस्तानमधील मजबूत संबंधांवर पाकिस्तानमधील अंतर्गत राजकीय बदलांचा परिणाम होणार नाही, असं मत चिनी आणि पाकिस्तानी विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.
शरीफ कुटुंबाचे नेहमीच चीनच्या बाजूला झुकते माप
लेखात म्हटले आहे की, 'पाकिस्तानचे संभाव्य नवीन पंतप्रधान शरीफ कुटुंबातील आहेत. शरीफ कुटुंब बऱ्याच काळापासून चीन-पाकिस्तान संबंधांना प्रोत्साहन देत आहे. अशा परिस्थितीत आता दोन्ही देशांमधील संबंध इम्रान खान यांच्या कार्यकाळात होते त्याही पेक्षा अधिक चांगले होऊ शकतील.'
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Pakistan : आज शाहबाज शरीफ पंतप्रधानपदी विराजमान होणार, शपथविधी आधी कोर्टात हजेरी?
- Imran Khan : सत्तेच्या 'पीच'वर कसे बाद झाले इम्रान खान; असा झाला 'पव्हेलियन'मध्ये पोहोचण्यापर्यंतचा प्रवास
- Viral Video : धक्कादायक! इमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमानाचे दोन तुकडे, तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
