(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistan : आज शाहबाज शरीफ पंतप्रधानपदी विराजमान होणार, शपथविधी आधी कोर्टात हजेरी?
Shahbaz Sharif : पाकिस्तानच्या पंतप्रधान बनण्यासाठी शाहबाज शरीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. आज त्यांचा शपथविधी होणार असून त्याआधी त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कोर्टात हजेरी लावायची आहे.
Shahbaz Sharif Set to be New PM : इम्रान खान (Imran Khan) सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर आता शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनणार आहेत. आजच्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता पाकिस्तान संसदेच्या कामकाजाला सुरुवात होईल. संयुक्त विपक्षाने पाकिस्तानी मुस्लिम लीग-नवाज म्हणजेच पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. दरम्यान पीटीआयकडून शाह महमूद कुरेशी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत.
काल दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शेहबाज शरीफ यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज भरताना शाह मेहमूद कुरेशी यांचा पीएमएलएन नेते एहसान इक्बाल यांच्याशी वादही झाला होता. तो कॅमेऱ्यातही रेकॉर्ड झाला आहे.
इम्रान खानच्या जवळचे पीटीआय नेते नाराज असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहेत. त्यामुळे पीटीआय नेते कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांच्यासाठी खुर्ची आता खूप दूर असल्याचं म्हटलं जात आहे. कारण 9 आणि 10 एप्रिलच्या रात्री संसदेत झालेल्या मतदानादरम्यान विरोधकांनी आपले बहुमत सिद्ध केले आहे. विरोधी पक्षांकडे बहुमत आहे. शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांना 174 मतं मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ आज भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता शपथ घेणार आहेत. शाहबाज शरीफ यांना राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्या हस्ते पंतप्रधान पदाची शपथ देण्यात येणार आहे. नवाझ शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान होणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Pakistan Political Crisis: पंतप्रधानांचे निवासस्थान सोडल्यानंतर इम्रान खान यांचे पहिले ट्वीट, म्हणाले...
- Imran Khan : सत्तेच्या 'पीच'वर कसे बाद झाले इम्रान खान; असा झाला 'पव्हेलियन'मध्ये पोहोचण्यापर्यंतचा प्रवास
- Pakistan : पाकिस्तानमध्ये एकीकडे राजकीय संकट तर दुसरीकडे 'शाहीन 3' मिसाईल चाचणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha