एक्स्प्लोर

Imran Khan : सत्तेच्या 'पीच'वर कसे बाद झाले इम्रान खान; असा झाला 'पव्हेलियन'मध्ये पोहोचण्यापर्यंतचा प्रवास

Imran Khan : पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकारने नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून बाहेर पडावे लागले.

Imran Khan :पाकिस्तान (Pakistan) तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकारने नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून बाहेर पडावे लागले. पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावात त्यांच्या सरकारचा पराभव झाला. इम्रान खान यांच्या विरोधात 174 मते पडली. तर, इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. 342 सदस्यांच्या संसदेत 174 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. मात्र, इम्रान खान यांना सत्तेतून बेदखल करण्याचे काम एका दिवसाचे नव्हते. त्याची दीर्घ घटनाक्रम आहे. चला, त्यावर एक नजर टाकूया.

जिओ टीव्हीनुसार, 2021 च्या अखेरीस, पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) ने पाकिस्तान मुस्लिम लीग (N) चे सुप्रीमो नवाझ शरीफ यांना तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी राजी करण्यास सुरुवात केली होती.

  • 28 नोव्हेंबर 2021 : पीपीपीचे दिग्गज नेते खुर्शीद शाह यांनी संसदेत इन-हाउस बदलाचे संकेत दिले आणि म्हटले की, पंतप्रधान इम्रान खान यांची हकालपट्टी करण्यासाठी विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ असेल.
  • 24 डिसेंबर 2021 : PML-N नेते अयाज सादिक यांनी देखील सूचित केले की, विरोधी पक्ष सत्ता बदलाची तयारी करत आहेत.
  • 11 जानेवारी 2022 : PML-N चे दिग्गज नेते ख्वाजा आसिफ म्हणाले की, सरकारने बहुमत गमावले असून आता सत्ता बदल होईल.
  • 18 जानेवारी 2022 : पीपीपी अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले की, सिनेट अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास आणण्याची तयारीत आहेत. विरोधकांना पंतप्रधानांना पायउतार करायचं आहे.
  • 21 जानेवारी 2022 : अयाज सादिक म्हणाले की, विरोधक पंतप्रधानांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी तयार असून लवकरच वेळ ठरवतील.
  • 7 फेब्रुवारी 2022 : पीएमएल-एन आणि पीपीपी यांनी अविश्वास प्रस्तावावर अधिकृतपणे चर्चा केली.
  • 8 फेब्रुवारी : शाहबाज यांनी एमक्यूएम-पीकडे इम्रान खानविरुद्ध अविश्वास प्रस्तावाचा पर्याय सादर केला. एमक्यूएम-पी नेता आमिर खान यांनी पक्षाच्या समन्वय समितीसमोर प्रस्तावासाची विनंती सादर करण्याची घोषणा केली.
  • 11 फेब्रुवारी : GE TV नुसार, पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (PDM) प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी विरोधकांच्या वतीने पंतप्रधानांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली.
  • 8 मार्च : विरोधकांनी अखेर अविश्वास ठराव मांडला.
  • 12 मार्च : नवाझ शरीफ आणि असंतुष्ट पीटीआय नेते अलीम खान यांनी लंडनमध्ये अविश्वास प्रस्तावावर चर्चा केली.
  • 27 मार्च : इम्रान खान यांनी दावा केला की विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव हा त्यांना सत्तेतून बाहेर करण्याच्या परकीय निधीसाठीच्या षडयंत्राचा भाग आहे.
  • 28 मार्च : संसदेत विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. यावेळी पीटीआयला पीएमएल-क्यू पक्षाने पाठिंब्याचं आश्वासन दिलं. त्यावेळी BAPने विरोधकांशी हातमिळवणी केली. बलुचिस्तानमधील अपक्ष एमएनए मोहम्मद अस्लम भुतानी यांनीही सत्ताधारी आघाडी सोडून विरोधी पक्षात प्रवेश केला.
  • 31 मार्च : पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावासाठी पाकिस्तान संसदेचे अधिवेशन 3 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आलं.
  • 3 एप्रिल : संसदेचे अध्यक्ष कासिम सुरी यांनी अविश्वास प्रस्ताव नाकारला, प्रस्तावाला असंवैधानिक म्हटलं आणि कार्यवाही संपवली. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सूचनेनुसार राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी संसद बरखास्त केली. सर्वोच्च न्यायालयाने राजकीय परिस्थितीची स्वतःहून दखल घेतली.
  • 7 एप्रिल :  सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा संसदेची स्थापना करत संसदेचे अध्यक्ष असद कैसर यांना शनिवारी अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले.
  • 8 एप्रिल : इम्रान खान म्हणाले, 'आपण परदेशी सरकारची स्थापना सहन करणार नाही आणि तसे झाल्यास जनतेकडे पाठींबा मागू.'
  • 9 एप्रिल 2022 च्या रात्री इम्रान खान यांच्या सरकारचा अविश्वास प्रस्तावात पराभव झाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होताMihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हातीAnandache Paan : अनुवादक प्रफुल्ल शिलेदार आणि लेखक हृषिकेश पाळंदे यांच्याशी खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं विधान
Embed widget