एक्स्प्लोर

China Corona : चीनचा हैराण करणारा दावा; म्हणतोय 'कोविडवर केली मात, मृत्यूदरही घसरला'

China Corona : चीनने कोरोना महामारी संदर्भात मोठा दावा केला आहे. कोरोना विषाणू पसरवल्याचा आरोप असणारा चीन आता कोरोना विषाणूवर मात केल्याचा दावा करत आहे.

China Coronavirus Updates : चीनने (China) कोरोना महामारी (Coronavirus Updates) संदर्भात मोठा दावा केला आहे. कोरोना विषाणू (Covid-19 Virus) पसरवल्याचा आरोप असणारा चीन आता कोरोना विषाणूवर मात केल्याचा दावा करत आहे. चीनमधील (China News) सत्ताधारी असलेल्या कम्युनिस्ट पक्षाने (Chinese Communist Party) म्हटलं आहे की, "चीनमधील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर मोठ्या प्रमाणात घसरला असून कोरोना विषाणूला (Covid-19 Updates) हरवलं आहे. चीन सरकारने दावा केला आहे, "झिरो कोविड धोरणामुळे (Zero Covid Policy) त्यांना कोरोनाच्या व्हेरियंटचा (Corona Variant) प्रसार रोखण्यात यश मिळालं आहे."

'चीनमधील मृत्यूदर जगात सर्वात कमी'

सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी दावा केला आहे की, चीनमधील मृत्यूदर जगात सर्वात कमी आहे. चीनच्या म्हणण्यानुसार, कोरोना नियम आणि निर्बंध हटवल्यानंतर चीन कोविड संसर्गावर मात करण्यात यशस्वी ठरला आहे. चीन सरकारच्या प्रयत्नामुळे 20 कोटींहून अधिक लोकांवर उपचार झाले आहेत. दरम्यान, चीन सरकारच्या या आकड्यावर इतर देशातील शास्त्रज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कारण कोरोना महामारी पसरल्यापासून म्हणजे मागील तीन वर्षांमध्ये कठोर निर्बंध असूनही चीनमधील कोरोना संक्रमण कमी झालं नव्हतं.

गेल्या तीन वर्षात चीनमधील कोरोना संसर्ग वाढताच

काही मीडिया रिपोर्टनुसार, चीनमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरपासून लाखो लोकांना कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आणि हजारो लोकांचा यामुळे मृत्यू झाला. यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. पण आता चीन सरकारने गुरुवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, 20 कोटी रुग्णांवर उपचार झाले असून 8 लाख गंभीर रुग्णांनाही उपचार मिळाले. चीन प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये कोरोनाचा व्यापक प्रसार रोखण्यात मदत झाली आहे.

चीनच्या दाव्याने जगभरातील शास्त्रज्ञ हैराण

डिसेंबर महिन्यामध्ये समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, "जानेवारी महिन्यात 50 लाख नागरिकांना कोरोना होण्याची शक्यता आहे. त्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीला चीनने अचानक आपले झिरो कोविड धोरण आणि निर्बंध हटवले." एका प्रसिद्ध सरकारी शास्त्रज्ञाने गेल्या महिन्यात उघड केलं होतं की, "चीनमध्ये 80 टक्के लोकसंख्येला कोरोना विषाणूचा फटका बसला आहे." त्यानंतर आता चीनने कोरोना महामारीवर मात केल्याचा दावा केल्याने जगभरातील शास्त्रज्ञ हैराण झाले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

China Corona : चीनमध्ये जुनं संकट पुन्हा नव्याने समोर, जानेवारीत 50 लाख नागरिकांना कोरोना होण्याची शक्यता : रिपोर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12:00PM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहितीVivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हेOld Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?
नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, ठाकरे गटाचा आक्षेप, नेमकं कारण काय?
Rohit Sharma : रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टी 20 वर्ल्ड कप गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
Embed widget