Bus Accident : ख्रिसमसच्या दिवशी मोठी दुर्घटना, 100 फूट खोल नदीत पडली बस, सहा जणांचा मृत्यू, स्पेनमधील घटना
Bus Accident in Spain : या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर चालक आणि अन्य एक प्रवासी जखमी झाले.
Bus Accident in Spain : ख्रिसमसच्या (Christmas 2022) दिवशी स्पेनमध्ये (Spain Accident) एक मोठी दुर्घटना घडली आहे. रस्त्यावरून धावणारी बस अचानक पुलावरून नदीत पडली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उत्तर-पश्चिम स्पेनमधील गॅलिसिया येथे झालेल्या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर चालक आणि अन्य एक प्रवासी जखमी झाले.
सुमारे 100 फूट खोल दरीत पडली बस
पुलाखालून सुमारे 30 मीटर (100 फूट) चालती बस लेरेज नदीत पडली. याबाबत माहिती अशी की, मुसळधार पावसातून गाडी चालवणाऱ्या मोटारसायकलस्वाराला पुलावरील तुटलेली रेलिंग दिसली आणि त्याने तत्क्षणी आपत्कालीन सेवांना कॉल केला. त्यानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बस तसेच प्रवाशांना नदीतून बाहेर काढले.
अपघाताचे कारण अद्याप अस्पष्टच
स्पॅनिश गार्डकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण आठ जण होते. उर्वरित दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा, असे प्रादेशिक अध्यक्ष अल्फोन्सो रुएडा यांनी सांगितले. अल्फोन्सो रुएडा यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करताना म्हटले आहे की, "आम्हाला अद्याप अपघाताची कारणे निश्चितपणे माहित नाहीत, परंतु हे खरे आहे की, काल रात्री हवामान खूपच खराब होते."
अपघातस्थळाची छायाचित्रे पोस्ट
रुएडा यांनी नंतर सोशल मीडियावर सुरक्षा कर्मचाऱ्यांबद्दल लिहिले आणि बचाव कार्यात सहभागी झालेल्या लोकांचे आभार मानले. त्यांनी अपघातस्थळी दिलेल्या भेटीची छायाचित्रे पोस्ट केली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, "सर्व पोलीस बचाव कार्यात गुंतले आहेत. पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना..