एक्स्प्लोर
अफगाणिस्तानमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 23 जणांचा मृत्यू
काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये संसदेजवळ आज दोन साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले आहेत. या स्फोटानंतर काबुल शहर हादरुन निघालं आहे. या बॉम्बस्फोटांमध्ये 23 जण मृत्यूमुखी पडले आहेत.
काबुलमध्ये झालेल्या हा हल्ल्यात संसदेतील लोकांना लक्ष्य करण्यात आलं होतं. 23 जणांना या हल्ल्यात आपली जीव गमावावा लागला, तर 45 जण गंभीर जखमी झाले आहेत. अफगाण तालिबान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले बहुतांश सामान्य नागरिक आहेत, तसंच संसदेतील काही कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे.
दहशतवाद्यांनी एका मिनी बसमध्ये बॉम्ब ठेवले असल्याची माहिती एनडीएसच्या सुत्रांनी दिली आहे. गर्दीच्या वेळी हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. एनडीएस या अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यापूर्वी कारमध्ये असलेल्या दहशतवाद्यानं स्वत:ला उडवत स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला, तर 9 जण गंभीर जखमी झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement