एक्स्प्लोर

Black Money | स्विस बँकेने भारतीय खातेदारांची दुसरी यादी सोपवली!

परदेशात जमा असलेल्या काळ्या पैशांविरोधात मोदी सरकारच्या लढाईला मोठं यश मिळालं आहे. स्वित्झर्लंडने स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची माहिती सरकारकडे सोपवली आहे.

नवी दिल्ली : परदेशात जमा असलेल्या काळा पैशांविरोधात मोदी सरकारच्या लढाईला शुक्रवारी (9 ऑक्टोबर) मोठं यश मिळालं आहे. स्वित्झर्लंडने दुसऱ्यांदा स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची माहिती सोपवली आहे. 86 देशांसह साथ 31 लाख आर्थिक खातांसंदर्भातील माहिती शेअर केल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. भारतीय नागरिक आणि संस्थांच्या आर्थिक खात्यांची ही माहिती स्वित्झर्लंडससोबत केलेल्या देवाण-घेवाणीवरुन मिळाली आहे. स्वित्झर्लंडच्या सांघिक कर प्रशासन अर्थात एफटीएने यंदा माहितीच्या स्वयंचलित विनिमयच्या (AEOI) जागतिक मानकांच्या चौकटीत आर्थिक खात्यांची माहिती शेअर केलेल्या 86 देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

याआधी स्वित्झर्लंडने सप्टेंबर 2019 मध्ये भारतासह 75 देशांसह माहिती शेअर केली होती. काळ्या पैशांविरोधात लढण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हणून स्वित्झर्लंडने भारताला स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची माहिती दिली होती.

एफटीएने शुक्रवार जारी केलेल्या वक्तव्यानुसार, यंदाच्या देवाण-घेवाणीमध्ये सुमारे 31 लाख आर्थिक खात्यांचा समावेश आहे. 2019 मध्येही जवळपास एवढ्याच खात्यांची माहिती देण्यात आली होती. मात्र या वक्तव्यात 86 देशांमध्ये भारताच्या नावाचा स्वतंत्र उल्लेख नव्हता. परंतु अधिकाऱ्यांनी सांगितलं की, भारत त्या प्रमुख देशांमध्ये आहे, ज्यांच्यासोबत स्वित्झर्लंडने स्विस बँकांच्या ग्राहक आणि इतर आर्थिक संस्थांच्या आर्थिक खात्यांसंदर्भाचं विवरण शेअर केलं आहे.

अधिकारी पुढे म्हणाले की, स्विस अधिकाऱ्यांनी भारताच्या विनंतीनुसार मागील एक वर्षात करचोरी आणि आर्थिक अफरातफरीप्रकरणी चौकशी सुरु असलेल्या 100 पेक्षा अधिक भारतीय नागरिकांची आणि संस्थांची माहिती शेअर केली होती. गोपनीयतेचा दाखल देत भारतीयांच्या सध्याच्या खात्यांची संख्या किंवा त्यात जमा रकमेबाबत माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.

स्विस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत ओळख, खातं आणि आर्थिक व्यवहार यांचा समावेश आहे. करदात्यांनी आयकर परताव्यात आपल्या आर्थिक खात्यांबाबत योग्य माहिती दिली आहे की नाहीय हे आयकर अधिकाऱ्यांना समजू शकेल. दरम्यान भारताला एईओआय अंतर्गत स्वित्झर्लंडमधून पहिली माहिती सप्टेंबर 2019 मध्ये होती. त्यावेळी स्वित्झर्लंडने 75 देशांना माहिती शेअर केली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Zero Hour Ek Hai To Safe Hai : एक है तो सेफ है, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा नाराZero Hour Eknath Shinde : माहीमची जागा, एकनाथ शिंदेंकडून एका दगडात दोन 'पक्ष'?Uddhav Thackeray On Eknath Shinde : माझी बॅग तुला तपासायला देतो फक्त कपडे चोरु नको

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Embed widget