America : गर्भपातावर बंदी घालण्याचा प्रयत्न केल्यास व्हेटो वापरणार, रिपब्लिकन कॉंग्रेस जिंकल्यास बायडेन यांची घोषणा
America : रिपब्लिकन कॉंग्रेस जिंकल्यास आणि गर्भपातावर बंदी घालण्याचा प्रयत्न केल्यास बायडेन यांनी व्हेटो वापरण्याची शपथ घेतली
America : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन काँग्रेस जिंकल्यास तसेच अमेरिका देशात गर्भपात बेकायदेशीर करण्यासाठी कायदे मंजूर केल्यास महिलांच्या हक्कांच्या संरक्षणसाठी त्यांची व्हेटो पॉवर वापरण्याची शपथ घेतली.
महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी ते काय करतील? बायडेन म्हणाले..
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बायडेन यांना विचारले की, रिपब्लिकननी कायदेमंडळावर नियंत्रण मिळवले तर महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी ते काय करतील? त्यावेळी ते म्हणाले, रिपब्लिकन कॉंग्रेस जिंकल्यास आणि गर्भपातावर बंदी घालण्याचा प्रयत्न केल्यास बिडेन यांनी व्हेटो वापरणार असल्याचे आश्वासन दिले. पुढच्या महिन्याच्या निवडणुकीत डेमोक्रेटचा विजय झाल्यास जानेवारीमध्ये गर्भपाताच्या अधिकारांना संहिताबद्ध करण्यासाठी कायद्यावर स्वाक्षरी करण्याचे आश्वासन दिले.
अमेरिकेत महिलांचा गर्भपाताचा अधिकार रद्द
अमेरिकेत सुमारे 50 वर्षांपासून गर्भपाताला असलेले घटनात्मक संरक्षण संपुष्टात आले असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महिलांचा गर्भपाताचा अधिकार काढून घेतला होता. 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताच्या एका प्रकरणात गर्भपात करायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार महिलेचा आहे, असे म्हटले होते.गर्भपात कायदा रद्द करण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा मसुदा दोन महिन्यांपूर्वी फुटल्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली होती. गर्भपाताचा अधिकार रद्द करण्याच्या न्यायालयाच्या संभाव्य निकालाची कुणकुण लागताच महिलांनी ठिकठिकाणी निदर्शने केली होती.