![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Biden in Israel : धगधगत्या युद्धात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायल दौरा, पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी चर्चा करणार
US President Biden Israel Visit : इस्रायल-हमास युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन तेल अवीवमध्ये पोहोचले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी त्यांचं विमानतळावर मिठी मारून स्वागत केलं.
![Biden in Israel : धगधगत्या युद्धात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायल दौरा, पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी चर्चा करणार Biden flies into israel hama war update gaza palistine attack marathi news Biden in Israel : धगधगत्या युद्धात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायल दौरा, पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी चर्चा करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/fd03d671967a15e1309b74efdb93b7571697617300942322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Joe Biden Israel Visit : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) इस्रायलमध्ये (Israel Visit) दाखल झाले आहेत. बायडन (Joe Biden) पंतप्रधान नेत्यानाहू (Benjamin Netanyahu) यांच्याशी चर्चा करणार आहेत. इस्रायल-हमास युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन तेल अवीवमध्ये पोहोचले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी त्यांचं विमानतळावर मिठी मारून स्वागत केलं. इस्रायलमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अस्थिरता माजली आहे. आज, बुधवारी 18 ऑक्टोबरला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन इस्त्रायल दौऱ्यावर आहेत. बायडेन इस्रायलच्या युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेतील. गाझा येथील हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांचा जॉर्डन दौराही रद्द करण्यात आला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची इस्रायल भेट
इस्रायल-हमास युद्धाच्या तणावपूर्ण स्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन इस्रायल दौऱ्यावर आहेत. जो बायडन आज इस्रायल दौरा करून युद्धाच्या परिस्थितीची पाहणी करणार आहेत. बायडन मध्यपूर्व देशांचा दौरा करणार आहेत. या दरम्यान ते जॉर्डन आणि इजिप्त देशांनाही भेट देणार होते, मात्र आता त्यांचा जॉर्डन दौरा रद्द करण्यात आल आहे.
गाझा एअरस्टाईकमध्ये 500 नागरिकांचा मृत्यू
गाझामधील अल-अहली रुग्णालयावर इस्रायलने केलेल्या कथित हवाई हल्ल्यात सुमारे 500 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुस्लिम देशांनी या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे, तर इस्रायलने या हल्ल्यामागे आपला हात नसल्याचं म्हटलं आहे. गाझामध्ये इस्रायलच्या भीषण हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झाल्याचे दृश्य आहे. लोकांचे जीवन नरकासारखे झाले आहे. येथील भीषण हल्ल्यांमुळे इजिप्तच्या सीमेवर जीवनावश्यक वस्तूंची मदतही थांबली आहे. परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली चिंता
इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझामध्ये हजारो लोक अडकले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी या प्रकरणावर चिंता व्यक्त करत म्हटलं की, 'सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांना पूर्णपणे जगण्याचा अधिकार आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे सर्वसामान्यांचे कोणतंही नुकसान होऊ नये.'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)