एक्स्प्लोर

Bernie Madoff : ₹5.54 लाख कोटींची फसवणूक; 20 वर्षे जगाला मूर्ख बनवणाऱ्या धोकेबाजची कहाणी; तब्बल दीडशे वर्षांची शिक्षा, एका मुलानं गळ्याला दोरी लावली, दुसरा कॅन्सरने गेला

Bernie Madoff Scam Explained : 2005 व 2006 मध्ये झालेल्या तपासांतूनही काहीच सापडले नाही. हा संपूर्ण अ‍ॅडव्हायजरी व्यवसाय एका स्वतंत्र फ्लोअरवर अत्यंत गोपनीयतेने चालवला जात होता.

Bernie Madoff Scam Explained : सन 2008 अवघं जग मंदीच्या खाईमध्ये जात असताना महासत्ता असलेल्या अमेरिकेत बँकांवर बँका बुडत चालल्या होत्या. याचवेळी अमेरिकेच्या इतिहासातील (Largest financial fraud in history) सर्वात मोठा घोटाळा सुद्धा उघडकीस आला होता. या घोटाळ्याने अमेरिक हजारो गुंतवणूकदारांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. रिटायर्ड लोकांचे निवृत्तिवेतन, चॅरिटीजचे कार्य, पेंशन फंड्सचे भविष्य असं सगळं बुडालं होतं. यानंतर या प्रकरणाची चौकशी झाली आणि दोषीला तब्बल दीडशे वर्षांची शिक्षा (Madoff 150 year sentence) ठोठावण्यात आली. त्याचं नाव होतं. बर्नार्ड लॉरेंस मॅडॉफ (Bernie Madoff Ponzi scheme), जो कधीकाळी NASDAQ स्टॉक एक्सचेंजचा चेअरमन होता. त्याने तब्बल 65 अब्ज डॉलर्स (आजच्या हिशोबाने ₹5.54 लाख कोटी) ची पोंझी स्कीम राबवून जगभरातील 40,000 हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. 10 डिसेंबर 2008 या दिवशी अमेरिकेच्या आर्थिक इतिहासातील सर्वात मोठा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. 

मॅडॉफची फर्म दोन भागांत काम करत होती

तसं पाहिल्यास मॅडॉफची फर्म दोन भागांमध्ये काम करत होती. त्यामध्ये एक कायदेशीर ट्रेडिंग बिझनेस आणि दुसरं म्हणजे गुप्त "अ‍ॅडव्हायजरी" बिझनेस. याच दुसऱ्या व्यवसायाद्वारे त्याने (Bernie Madoff fraud explained) फसवणूक केली. तो गुंतवणूकदारांना दरवर्षी 8-12 टक्के हमखास परतावा देण्याचं आश्वासन देत असे. मात्र प्रत्यक्षात, कोणतीही गुंतवणूक होत नव्हती. नव्या गुंतवणूकदारांचे पैसे जुन्यांना परताव्यासाठी वापरले जात होते, हेच म्हणजे पोंझी स्कीम (Bernie Madoff Ponzi scheme) होती. 

मॅडॉफने NASDAQ चेअरमन पदाचा फायदा घेतला

लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी मॅडॉफने त्याच्या प्रतिष्ठेचा, म्हणजेच NASDAQ चेअरमन पदाचा फायदा घेतला. तो इतका प्रभावशाली होता की SEC (अमेरिकेची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन) देखील त्याच्यावर संशय घेऊ शकली नाही. या प्रकरणात काही वेळा तपासही झाला, पण कोणतेही ठोस पुरावे न सापडल्यामुळे प्रकरण मिटवले गेले.

मॅडॉफ फसवणूक कशी करत होता? 

मॅडॉफने गुंतवणूकदारांना बनावट स्टेटमेंट्स देऊन त्यांचा पैसा ब्लू-चिप स्टॉक्स आणि ट्रेझरी सिक्युरिटीजमध्ये गुंतवल्याचे सांगत होता. प्रत्यक्षात, क्लायंटचा पैसा एका बँक खात्यात जमा केला जात असे. जेव्हा कोणी पैसे मागत असे, तेव्हा नवीन गुंतवणूकदारांच्या पैशांतून पैसे दिले जात होते. त्याने SEC (सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशन) सारख्या संस्थांना देखील आपल्या प्रभावामुळे आणि बनावट अहवालांमुळे फसवले होते. 2005 व 2006 मध्ये झालेल्या तपासांतूनही काहीच सापडले नाही. हा संपूर्ण अ‍ॅडव्हायजरी व्यवसाय एका स्वतंत्र फ्लोअरवर अत्यंत गोपनीयतेने चालवला जात होता.

अन् मॅडॉफने गुन्हा कबूल केला

2008 च्या जागतिक आर्थिक मंदीत लोकांनी एकाच वेळी पैसे मागायला सुरुवात केली. त्यावेळी मॅडॉफकडे फक्त $300 मिलियन शिल्लक होते. तो पैसे परत करू शकत नव्हता. शेवटी, 10 डिसेंबर 2008 रोजी त्याने आपल्या दोन मुलांना सगळं कबूल केलं. दुसऱ्या दिवशी एफबीआयने त्याला अटक केली. 2009 मध्ये मॅडॉफने गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने त्याला 150 वर्षांची तुरुंगवास आणि $170 अब्ज दंड भरण्याची शिक्षा सुनावली. मोठा मुलगा मार्क याने आत्महत्या केली, आणि दुसरा मुलगा अँड्र्यूचा कॅन्सरने मृत्यू झाला. यामुळे लोकांना भीकेला लावणाऱ्या मॅडॉफच्या कुटुंबाचा भयानक शेवट झाला. 

दीडशे वर्षाची शिक्षा अन् तुरुंगात किडनी विकाराने मृत्यू 

मॅडॉफने केलेल्या महाघोटाळ्याने अनेक रिटायर्ड व्यक्ती, चॅरिटी संस्था आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार यांना मोठा आर्थिक फटका बसला. इतर संस्थांनाही त्यांच्या निष्काळजीपणामुळे टिकेचा सामना करावा लागला. 2021 पर्यंत फसवणुकीचे शिकार झालेल्यांना $14 अब्ज परत करण्यात आले. अखेर मॅडॉफचा मृत्यू 14 एप्रिल 2021 रोजी किडनीच्या आजारामुळे तुरुंगात झाला. मात्र,  आर्थिक विश्वाला हादरवणारा, विश्वासघाताने भरलेला इतिहास लिहून ठेवला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget