एक्स्प्लोर
खात्यात चुकून जमा झालेले 86 लाख रुपये दाम्पत्याने मौजमजेत उडवले!
बँकेने चुकून त्यांच्या खात्यात 1 लाख 12 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 86 लाख रुपये जमा केले. परंतु या दाम्पत्याने बँकेला कोणतीही माहिती न देता दे पैसे खर्च केले.
पेन्सिलव्हेनिया (अमेरिका) : जर तुमच्या बँक खात्यात अचानक लाखो रुपये जमा झाले तर तुम्ही काय कराल? एकतर तुम्ही याबाबत बँकेला माहिती द्याल किंवा एवढी मोठी रक्कम पाहून आमिषाला बळी पडाल. अमिरेकतील पेन्सिलव्हेनिया प्रांतामधील एका दाम्पत्यासोबत असं काहीसं घडलं.
बँकेने चुकून त्यांच्या खात्यात 1 लाख 12 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 86 लाख रुपये जमा केले. परंतु या दाम्पत्याने बँकेला कोणतीही माहिती न देता दे पैसे खर्च केले. रॉबर्ट (वय 36 वर्ष)आणि टिफनी विल्यम्स (वय 35 वर्ष) असं दाम्पत्याचं नाव असून ते मॉन्टोर्सविल इथे राहतं.
लिकमिंग कौंटी जिल्हा कोर्टात त्यांच्याविरोधात चोरी आणि चोरलेली मालमत्ता प्राप्त करण्याच्या खटल्याची नोंद झाली आहे. तसंच त्यांना बँकेच्या सुमारे 1 लाख 7 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 77 लाख रुपयांच्या ओव्हरड्राफ्ट शुल्काचा (खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढणे) सामना करावा लागत आहे.
सुमारे दोन आठवड्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. बँक खात्यात जमा झालेल्या रकमेतून या दाम्पत्याने 3 जून ते 19 जून या काळात एसएयूव्ही, कॅम्पर, दोन चारचाकी, कार ट्रेलर आणि इतर काही वस्तूंची खरेदी केल्याचं टिफनी विल्यम्सने तपासादरम्यान सांगितलं.
कधी घडली घटना?
31 मे रोजी जॉर्जियामधील एका ग्राहकाने 1 लाख 20 हजार डॉलर बीबीअॅण्डटी बँकेत जमा केले होते. परंतु इथे बँकेकडून चूक झाली. कर्मचाऱ्याने चुकीचा अकाऊंट नंबर एन्टर केला. यानंतर ग्राहकाने बँकेशी संपर्क करुन आपल्या ठेवीविषयी विचारणा केली. यानंतर ही रक्कम विल्यम्स यांच्या जॉईंट अकाऊंटमध्ये जमा झाल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे एवढी मोठी रक्कम जमा होण्यापूर्वी या दाम्पत्याच्या खात्यात केवळ 1121 डॉलरच शिल्लक होते.
कोर्टात दाखल प्रतिज्ञापत्रानुसार, "21 जून रोजी बँकेने टिफनी विल्यम्सला संपर्क केला असता ती म्हणाली की, बिल भरल्यामुळे माझ्या खात्यात पैसे शिल्लक नाहीत. तसंच बिल भरण्यासाठी, कार दुरुस्तीसाठी काही पैसे खर्च झाले तर 15 हजार डॉलर मित्राला मदत म्हणून दिल्याचं टिफनी विल्यम्सने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं."
पैशांची परतफेड करण्यासाठी करार करण्यासाठी तयार असल्याचं टिफनी विल्यम्सने बँकेला सांगितलं. परंतु 21 जूननंतर बँकेची या दाम्पत्यासोबत कोणतीही बातचीत झालेली नाही, असं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
हे दाम्पत्य सोमवारी (9 सप्टेंबर) पहिल्यांदा कोर्टात हजर झालं. आम्हाला माहित होतं की हा पैसा आमचा नाही. पण आम्ही काही लोकांकडून चुकीचा कायदेशीर सल्ला घेतला आणि कदाचित ही सर्वात दुर्दैवी गोष्ट होती. 25,000 डॉलर (18 लाख रुपये) जमा केल्यानंतर या दाम्पत्याला जामीन मिळाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement