एक्स्प्लोर
Maharashtra Floods: 'दिवाळी करायची इच्छा नव्हती', Dharashiv मधील पूरग्रस्त Gatkul कुटुंबाचा आक्रोश
धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील भूम (Bhum) तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंब विस्थापित झाली आहेत, यात आंबे गावातील गटकुळ कुटुंबाचाही (Gatkul family) समावेश आहे. 'दिवाळी करायची तरी इच्छाच नव्हती आमची कारण घरं सगळं चिखल्यात पाण्यात गेलं होतं,' अशी व्यथा घरातील महिलेने मांडली. महापुराने या कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्धवस्त केला, घरात चिखल साचला आणि मुलांची पुस्तके व कपड्यांसारख्या वस्तू वाहून गेल्या. मात्र, त्यांच्या परिस्थितीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक संवेदनशील नागरिक आणि प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला. मिळालेल्या मदतीमुळे हे कुटुंब हळूहळू सावरत असून दिवाळी साजरी करत आहे. तरीही, नदीकाठी असलेले त्यांचे घर पक्के बांधून मिळावे, अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

















