एक्स्प्लोर

Nashik Crime Prakash Londhe: 'बॉस' लोंढे पिता-पुत्राची दिवाळी तुरुंगात; नाशिक मनपा दुसऱ्या अनधिकृत बंगल्यावरही हातोडा चालवणार?

Nashik Crime Prakash Londhe: न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रकाश लोंढेसह त्याचा मुलगा दीपक लोंढेवर बंगला बळकावून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे अंबड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

Nashik Crime Prakash Londhe: हॉटेल ऑरा बार गोळीबारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Praksh Londhe) आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे (Deepak Londhe) याच्यावर आणखी एक गंभीर आरोप झालाय. खुटवडनगर येथील एक बंगला बळकावून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात अंबड पोलिसांनी (Ambad Police) त्यांना ताब्यात घेतले असून, न्यायालयाने दोघांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे लोंढे पिता-पुत्राची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. 

फिर्यादी प्रमोद मधुकर अत्तरदे (वय 54, रा. एकता ग्रीन व्हॅली, पाथर्डी फाटा) यांच्या तक्रारीनुसार, संशयित प्रकाश लोंढे, दीपक लोंढे आणि भूषण लोंढे यांनी खुटवडनगरमधील सर्वे क्र. 51, प्लॉट क्र. 2 या ठिकाणी असलेला ‘पुष्कर बंगला’ अनाथाश्रम सुरू करण्याच्या बहाण्याने भाडेतत्त्वावर घेतला होता. त्यांनी आठ दिवसांत भाडे करारनामा करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी करारनामा न करता 2021 पासून आजपर्यंत कोणतेही भाडे दिले नाही.

Nashik Crime Prakash Londhe: बंगल्यावर अनधिकृत ताबा आणि खंडणीची मागणी

बंगल्यावर नियंत्रण मिळवल्यानंतर, अत्तरदे यांनी घटनास्थळी जाऊन विचारणा केली असता, दीपक आणि भूषण लोंढे यांनी त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. पुढे काही काळाने तेथे सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुंभ हे आपल्या कुटुंबियांसह राहत असल्याचे आढळून आले. अत्तरदे यांनी त्यांच्याशी बोलणे केल्यावर, त्यांनी सांगितले की, "बॉस प्रकाश लोंढे म्हणालेत की, हा बंगला हवा असेल तर दोन कोटी रुपये द्यावे लागतील." यावरून अत्तरदे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, लोंढे पिता-पुत्र व इतर दोन जणांवर खंडणी मागणे व जीवे मारण्याची धमकी देणे या गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik Crime Prakash Londhe: गोळीबार प्रकरणातील कोठडीतून अंबड पोलिसांच्या ताब्यात

सातपूर पोलिसांनी हॉटेल ऑरा बार गोळीबार प्रकरणात लोंढे पिता-पुत्रांना अटक केली होती. या गुन्ह्यात त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याच दरम्यान अंबड पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला. त्यांना शनिवारी (दि. 18) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता लोंढे पिता-पुत्रांची दिवाळी अंबड पोलीस ठाण्याच्या कोठडीतच होणार आहे.

Nashik Crime Prakash Londhe: अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

दरम्यान, हॉटेल ऑरा बार गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांनी प्रकाश लोंढे यांच्या अनधिकृत बांधकामांची झाडाझडती सुरू केली. सातपूर येथील आयटीआय सिग्नलजवळ असलेल्या लोंढे यांच्या एका अनधिकृत इमारतीवर हातोडा चालवण्यात आला. ही कारवाई पोलिस बंदोबस्तात पार पडली.

Nashik Crime Prakash Londhe: दुसऱ्या अनधिकृत बंगल्यावरही हातोडा? 

यानंतर महापालिकेने त्याच भागात नंदिनी नदीच्या पूररेषेत असलेल्या लोंढे यांच्या दुसऱ्या अनधिकृत बंगल्याला नोटीस चिटकवली असून, 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदुरकर, सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव, कार्यकारी अभियंता बांधकाम गांगुर्डे, अतिक्रमण प्रमुख तानाजी निगळ संजय कोठुळे त्यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात लोंढे याच्या अनधिकृत बंगल्यावर नोटीस चिटकवण्यात आली आहे. आता लोंढेच्या दुसऱ्या अनधिकृत बंगल्यावर नाशिक महापालिका हातोडा चालवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video

आणखी वाचा 

Nashik Crime Mama Rajwade: ठाकरेंना 'मामा' बनवून भाजपवासी झालेल्या राजवाडेंचे ग्रह फिरले; खंडणीसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange vs Dhananjay Munde : जरांगेंच्या हत्येचा कट? कोण जानी दुश्मन? Special Report
Devendra Fadnavis : जमीन व्यवहार प्रकणात कुणालाही सोडणार नाही,दोषींवर कारवाई होणार
Shiv Sena vs Nitesj Rane Kankavli : नितेश राणेंना शह देण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र? Special Report
Jarange Conspiracy Claim: 'प्रसिद्धीत राहण्यासाठी Jarange Patil कुठल्याही थराला जाऊ शकतात', Laxman Hake यांचा थेट हल्ला
Bajrang Saonawane on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाची चौकशी करा, बजरंग सोनावणेंची मागणी
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
Embed widget