एक्स्प्लोर
Manoj Jarange : शेतकऱ्यांची दिवाळी काळी, शेतकऱ्यांसाठी सरकारचे कपडे फाडावेच लागतील - जरांगे
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट (NCP-SP) आणि भाजप (BJP) सरकारमध्ये संघर्ष पेटला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने राज्यव्यापी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 'सरकारने केवळ टुटपुंजी रक्कम देऊन आपला हात झटकला आहे, शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली आहे', असा थेट आरोप राष्ट्रवादीने (शरद पवार गट) केला आहे. अनेक शेतकरी हताश होऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत असताना सत्ताधारी नेत्यांना त्याचं काहीच सोयरसुतक नाही, अशी टीकाही पक्षाने केली. या सरकारी अनास्थेच्या निषेधार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार गट) अनेक जिल्ह्यांमध्ये 'काळी दिवाळी' साजरी करत आणि भीक मागो आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















