Pro Kabaddi U Mumba player Death: यू मुम्बाच्या 'या' खेळाडूचे अचानक निधन, प्रो कबड्डीच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला
U mumba Player: तरुण खेळाडूच्या अकस्मात निधनामुळे आम्हाला खूप धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबीय, मित्र आणि संघ सहकाऱ्यांसोबत आमच्या प्रार्थना आहेत

Pro Kabaddi U Mumba player Death: प्रो कबड्डी लीगच्या चाह्त्यावर ऐन दिवाळीत दु:खाचा डोंगर कोसळलाय. जयपूर पिंक पँथर्सच्या सहाय्यक व्यवस्थापक वेदांत देवाडिगा वयाच्या 23 व्या वर्षी निधन झाल्यानतर आता यू मुंबा संघाच्या ए बालाभारती या खेळाडूचे ऐन विशीत अचानक निधन झालंय. प्रो कबड्डी लीगशी निगडित दोन युवा सदस्यांच्या मृत्यूच्या बातमीने क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसलाय.
जयपूर पिंक पँथर्सने सोशल मीडियावर एक शोकसंदेश शेअर करत वेदांत देवाडिगा यांच्या अकाली निधनाची खंत व्यक्त केली. संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, “वेदांत आमच्या परिवाराचा अत्यंत प्रिय सदस्य होते. त्यांच्या समर्पण आणि उत्साहाची आठवण नेहमी आमच्यासोबत राहील. या कठीण प्रसंगी आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.”
We are deeply saddened by the untimely passing of Balabharathi, who represented Yuva Mumba earlier this year.
— U Mumba (@umumba) October 20, 2025
Our thoughts and prayers are with his family, friends and teammates during this incredibly difficult time.#UMumba | #आमचीMumba pic.twitter.com/FMyXZkQrMT
त्याचप्रमाणे, यू मुंबाने बालाभारती यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. संघाने म्हटले, “तरुण खेळाडू बालाभारती यांच्या अकस्मात निधनामुळे आम्हाला खूप धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबीय, मित्र आणि संघ सहकाऱ्यांसोबत आमच्या प्रार्थना आहेत.”
प्रो कबड्डी लीगच्या चाहत्यांमध्ये शोककळा
बालाभारती कबड्डीत उदयोन्मुख खेळाडू म्हणून ओळखले जात होता. त्याच्या खेळातील कौशल्य, झपाटलेली मेहनत आणि प्रेक्षकांवरील प्रभावामुळे तो लवकरच चाहत्यांच्या मनात ठसा उमटवू शकला . वेदांत देवाडिगा आणि बालाभारती यांच्या अकाली निधनाने प्रो कबड्डी लीगच्या चाहत्यांमध्ये शोककळा निर्माण केली आहे. युवा खेळाडूंना गमावल्यामुळे संघ आणि क्रीडा समुदाय हळहळ व्यक्त करत आहे.
दिवाळीच्या आनंदाच्या सणात या दुर्दैवी घटनेने कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांमध्ये शोक निर्माण केला आहे. दोन्ही संघांनी अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून घटनेची माहिती दिली आणि आपल्या सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली.त्यामुळे युवा खेळाडूंच्या अकाली निधनाने क्रीडा क्षेत्राला मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.























