एक्स्प्लोर
बांगलादेशात स्फोट करुन ठाण्यात घुसलेल्या आरोपीला अटक

ठाणे: बांगलादेशात स्फोट घडवून भारतात पळून आलेल्या घुसखोराला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. बशीरमुल्ला शुकुरमुल्ला शेख असं या व्यक्तीचं नाव आहे.
मूळचा बांगलादेशचा असलेला बशीरमुल्लानं दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षणानंतर त्यानं स्वत:च्याच बायकोला बॉम्बनं उडवलं आणि भारतात घुसखोरी केली.
काही महिन्यांपूर्वी बशीरमुल्लाला बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला जामीनावर सोडण्यात आलं.
पोलिसांच्या हाती बशीरची कुंडली लागल्यानं त्याला पुन्हा बेड्या ठोकल्यात. न्यायालयानं बशीरला 7 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
आशिया कप 2022
पुणे
Advertisement
Advertisement


















