Baba Vanga : 2022मध्ये घडणार जगाला हादरवणाऱ्या गोष्टी, बाबा वंगा यांची धक्कादायक भविष्यवाणी
Baba Vanga : बल्गेरियातील बाबा वंगा यांनी केलेली भविष्यवाणी सोशल मीडियावर दरवर्षी व्हायरल होत असते. जाणून घेऊयात 2022 या वर्षीसाठी बाबा वंगा यांनी केलेली भविष्यवाणी...
Baba Vanga : लवकरच नवे वर्ष सुरू होणार आहे आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यसाठी लोक सज्ज झाले आहेत. बल्गेरियातील बाबा वंगा (Baba Vanga) यांनी केलेली भविष्यवाणी दर वर्षी सोशल मीडियावर व्हायरल होत असते. 'बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस' अशी त्यांची ओळख आहे. वयाच्या 12 व्या वर्षी बाबा वंगा यांची दृष्टी गेली. जाणून घेऊयात त्यांनी 2022 वर्षाबद्दल केलेल्या भविष्यवाणीबद्दल-
1. सायबेरियात विषाणूचा शोध लागेल –
सायबेरियामध्ये संशोधकांना एक प्राणघातक विषाणू सापडेल जो आतापर्यंत गोठलेला होता. ग्लोबल वॉर्मिंग वाढल्याने हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरेल, असं बाबा यांनी भविष्यवाणीत सांगितलंय.
2. भूकंप आणि त्सुनामीत वाढ-
बाबा वंगा यांनी 2004 च्या त्सुनामीचा अंदाज भविष्यवाणीत वर्तवला होता. आता त्यांनी 2022 मध्ये सांगितलेल्या भविष्यवाणीत असा अंदाज वर्तवला आहे की, अनेक आशियाई देश तसेच ऑस्ट्रेलियात भूकंप आणि त्सुनामी होऊ शकते.
3. पाण्याची टंचाई-
2022 मध्ये अनेक देश आणि शहरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू शकते. लोकसंख्या वाढणे आणि नद्यांचे प्रदूषण यामुळे आपल्यापैकी अनेकांना कारणांमुळे जगात पाण्याची टंचाई निर्माण होईल.
4. एलियन्सचा पृथ्वीवर हल्ला-
बाबा वंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीत असे सांगितले आहे की, 2022 मध्ये ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह एलियनद्वारे पृथ्वी ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्यासाठी पाठवला जाईल, त्यानंतर हे एलियन पृथ्वीवरील लोकांवर हल्ला करू शकतात.
5. गॅजेट्सचा होईल मोठ्याप्रमाणात वापर-
बाबा वंगा यांनी भविष्यवाणीत सांगितले की, लोकांचा गॅजेट्स समोरील स्क्रिन टाईम वाढेल. यामुळे लोकांची मानसिक स्थिती बिघडेल.
5. भारतात टोळांचा हल्ला-
2022 मध्ये भारतात तापमान वाढ होईल. देशात कमाल तापमान 50 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचेल, असं बाबा वंगा यांनी भविष्यवाणीत सांगितलं. तापमान वाढीमुळे टोळांचे प्रमाण वाढेल हे टोळ शेतातील पिकांवर हल्ला करतील.यामुळे मोठे नुकसान होऊ शकते, असंही बाबा वंगा यांच्या भविष्यवाणीत सांगण्यात आले आहे.
टीप : बल्गेरियातील बाबा वंगा यांची भविष्यवाणी दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होते. त्यांच्या या भविष्यवाणीचं एबीपी माझा समर्थन करत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
भारतातील कोरोना स्थिती भयावह, लॉकडाऊन लावणं गरजेचं : अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची