Canberra Airport Firing : ऑस्ट्रेलियामधील कॅनबेरा विमानतळावर गोळीबार; घटनेनं खळबळ, एक आरोपी अटकेत
Australia Canberra Airport Firing : ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथील विमानतळावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Australia Canberra Airport Firing : ऑस्ट्रेलियाची (Australia) राजधानी कॅनबेरा येथील विमानतळावर (Canberra Airport) गोळीबार (Firing) झाल्याची घटना समोर आली आहे. गोळीबारानंतर विमानतळावर चेंगराचेंगरी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर विमानतळावरील सर्वांना बाहेर काढत एअरपोर्ट पूर्णपणे रिकामं करण्यात आलं. गोळीबार प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार मिळाली आहे. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
#BREAKING Police say man detained after shots reported at Canberra airport pic.twitter.com/JsEAQdMakZ
— AFP News Agency (@AFP) August 14, 2022
गोळीबाराच्या घटनेमुळे विमानांचं उड्डाण थांबवलं
सिक्युरिटी चेकींगमध्ये एका प्रवाशाचा हत्यारासह पकडण्यात आलं. त्यानंतर त्या व्यक्तीनं विमानतळावर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबाराच्या घटनेनंतर कॅनबेरा विमानतळावरील विमानांचं उड्डाण थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कॅनबेरा विमानतळावरील इतर कामकाजही थांबवण्यात आलं आहे.
कॅनबेरा विमानतळावरील फोटो व्हायरल
मीडिया रिपोर्टनुसार, कॅनबेरा विमानतळावर झालेल्या गोळीबारात आठ ते दहा राऊंड फायर करण्यात आले. कॅनबेरा विमानतळावर झालेल्या गोळीबाराचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये विमानतळाच्या इमारतीवरील काचांवर गोळ्यांचे निशाण दिसत आहेत. तर काही फोटोंमध्ये सुरक्षारक्षक आणि पोलीस तपासणी करताना दिसत आहेत. काही फोटोंमध्ये विमानतळावर प्रवासी खाली झोपलेले दिसत आहेत, यावेळी सुरक्षा कर्मचारी त्यांची तपासणी करत आहेत.
आरोपीला पोलिसांकडून अटक
दरम्यान, हा अंधाधुंद गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, सुदैवानं या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही आणि जीवितहानीही झालेली नाही.
पोलिसांकडून अधिक तपास सुरु
पोलिसांना संशय आहे की, आरोपीचा साथीदार विमानतळावर लपलेला असून शकतो. यामुळे पोलीस आणि सुरक्षा दल अधिसक तपास करत आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता पोलीस अधिक माहिती देतील. यादरम्यान सुरक्षा दल विमानतळावर उपस्थित लोकांची चौकशी करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरची विक्री बंद होणार, कंपनीचा मोठा निर्णय, 'हे' आहे कारण
- Plane Landing Video : पाहता-पाहता अगदी डोक्यावरून गेलं विमान, प्लेन लँडिंगचा भन्नाट व्हिडीओ, एकदा नक्की पाहा
- Sri Lanka Crisis : श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींना सोडावं लागलं सिंगापूर, गोटाबाया राजपक्षे यांचा आता 'या' देशात आश्रय