NASA : 18 तारखेला काय होणार? पुढील तीन दिवस पृथ्वीसाठी अत्यंत महत्वाचे; NASAनं दिली महत्वाची माहिती
Asteroid To Come Close To Earth : 18 जानेवारी रोजी लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे.

Asteroid To Come Close To Earth : गेली अनेक वर्ष असं म्हणलं जात होतं की अॅस्टरॉइडमुळे पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो. अॅस्टरॉइड म्हणजे लघुग्रह. हे लघुग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात. असं म्हटलं जात की एक लघुग्रह एकदा पृथ्वीला धडकला होता. त्यामुळे पृथ्वीवरील डायनॉसॉर हे संपूष्टात आले. त्यानंतर अनेक लघुग्रह हे पृथ्वीच्या जवळून गेले. 18 जानेवारी रोजी सर्वात मोठा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. या लघुग्रहाचं नाव 7482 (1994 PC1) असं ठेवण्यात आलं आहे.
आजपासून तीन दिवसांनी म्हणजेच 18 तारखेला एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. या लघुग्रहाची रुंदी ही जवळपास 3 हजार 551 फूट आहे. एक्सपर्ट्सच्या मते हा लघुग्रह पृथ्वीपासून 1.2 मिलियन अंतरावरून जाणार आहे. नासानं या गोष्टीमुळे पृथ्वीला धोका असू शकतो, असं म्हणलं आहे.
नासा सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज यांनी त्यांच्या वेबसाइटवरून माहिती दिली आहे. त्यांनी वेबसाइटवरील माहितीमध्ये सांगितले की, या लघुग्रहामुळे पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो. नासाचे एक्सपर्ट गेली अनेक दिवस या लघुग्रहाचा अभ्यास करत आहेत. 18 जानेवारी रोजी जर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीनं या लघुग्रहाला खेचले तर हा लघुग्रह पृथ्वीला आदळू शकतो. त्यामुळे या लघुग्रहाचा पृथ्वीला धोका आहे.
नासानं भविष्यात लघुग्रहांना पृथ्वीवर आदळण्यापासून रोखण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी नासानं डार्ट मिशन लाँच केले आहे. गेल्या आठवड्यात देखील एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळ आला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
- Boris Johnson Controversy : प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्काराच्या पूर्वसंध्येला बोरिस जॉन्सन यांच्या कर्मचार्यांची पार्टी, सरकारने ब्रिटनच्या महाराणीची माफी मागितली
- India China Trade : सीमेवर तणाव असतानाही भारत-चीनमधील व्यापार विक्रमी, 2021मध्ये 125 अब्ज डॉलरचा व्यापार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
