एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राफेल करारानंतर अनिल अंबांनींच्या फ्रान्समधील कंपनीला 1120 कोटींची करमाफी, वृत्तपत्राच्या दाव्याने खळबळ
राफेल करारानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला 143.7 मिलियन युरो (162 मिलियन डॉलर) म्हणजे तब्बल 1 हजार 120 कोटी रुपयांची करमाफी देण्यात आली असल्याचा दावा फ्रेन्च मीडियाने केला आहे.
पॅरिस : राफेल करारानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला 143.7 मिलियन युरो (162 मिलियन डॉलर) म्हणजे तब्बल 1 हजार 120 कोटी रुपयांची करमाफी देण्यात आली असल्याचा असा दावा फ्रान्समधील 'ले मॉन्ड' या फ्रेन्च वृत्तपत्राने केला आहे. 2015 मध्ये फेब्रुवारी ते ऑक्टोबरदरम्यान राफेल लढाऊ विमान खरेदीसाठी करार प्रक्रिया सुरु होती. त्यासाठी भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशात चर्चा सुरु होती. त्याचवेळी अनिल अंबानींच्या कंपनीचा 1 हजार 120 कोटी रुपयांचा कर माफ करण्यात आला असल्याचा दावा 'ले मॉन्ड'ने केला आहे.
'रिलायन्स अॅटलान्टिक फ्लॅग फ्रान्स'ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर करात सूट देण्यात आली आहे. माध्यमांच्या दाव्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराची घोषणा केल्यानंतर अनिल अंबानी यांना करात सूट देण्यात आली.
'ले मॉन्ड'ने दिलेल्या वृत्तानुसार फेब्रुवारी ते ऑक्टोबर 2015 दरम्यान भारत आणि फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहार सुरु होता. याच कालावधीमध्ये अनिल अंबानी यांच्या कंपनीचा 143.7 मिलियन युरोंचा (1120 कोटी रुपये) कर माफ करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल करारावरुन केंद्र सरकार आणि उद्योगपती अनिल अंबानी यांना लक्ष्य करत आहेत. त्यात आता फ्रेन्च मीडियाच्या या रिपोर्टनंतर राहुल गांधी याप्रकरणी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
निवडणूक
राजकारण
Advertisement