नरेंद्र मोदी 'फादर ऑफ इंडिया', डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नरेंद्र मोदींचं कौतुक
न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींचं कामाचं कौतुक केलं.
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींनी भारतात केलेल्या कामाचं कौतुक केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना त्यांचा फादर ऑफ इंडिया असा उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान व्यक्तिमत्व आहेत. भारतातील परिस्थिती याआधी अशी नव्हती. मोदींनी विखुरलेल्या भारताला एकत्र आणलं. त्यामुळे ते भारताच्या राष्ट्रपित्यासारखेच आहेत. आपण त्यांना भारताचे फादर ऑफ इंडिया म्हणूया, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.
नरेंद्र मोदींच कौतुक करताना ट्रम्प यांनी त्यांची तुलना प्रसिद्ध गायक, अभिनेते एल्विस प्रेस्लीशी केली. ट्रम्प यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रेस्ली यांच्याप्रमाणे लोकप्रिय आहेत. असं वाटतंय की एल्विस प्रेस्ली पुन्हा आले आहेत.
US President: He (PM Modi) is a great gentleman & a great leader. I remember India before was very torn. There was a lot of dissention,fighting & he brought it all together. Like a father would bring it together. Maybe he is the Father of India. We'll call him the Father of India pic.twitter.com/YhDM3imoxl
— ANI (@ANI) September 24, 2019
न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानातील आयएसआय आणि अल कायदा याबाबत ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलतांना ट्रम्प यांनी म्हटलं की, दहशतवादाविरोधातील मोहिमेत अमेरिका भारतासोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान एकामेकांची चर्चा करून जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर तोडगा काढू शकतात.
संबंधित बातम्या#WATCH US President: I remember India before was very torn. There was a lot of dissension, fighting&he brought it all together. Like a father would. Maybe he is the Father of India...They love this gentleman to my right. People went crazy, he is like an American version of Elvis. pic.twitter.com/w1ZWYiaOSu
— ANI (@ANI) September 24, 2019
- इम्रान खान पुन्हा तोंडघशी; काश्मीरप्रश्नी भारत तयार असेल तरच मध्यस्थी, ट्रम्प यांचा पुनरुच्चार
- Howdy Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पाकिस्तानला सूचक इशारा
- Howdy Modi | 'हाऊडी मोदी' ला नरेंद्र मोदींकडून 'सगळं छान चाललंय' असं उत्तर
- भारतासाठी नरेंद्र मोदींचे कार्य अतुलनीय : डोनाल्ड ट्रम्प