America Shut Down 2023 : अमेरिकेत शटडाऊनची टांगती तलवार! 1 ऑक्टोबरपासून शटडाऊनची सुरुवात होणार?
America Shut Down 2023 : अमेरिकेत जून महिन्यात शमलेलं शटडाऊनचं संकट पुन्हा एकदा ओढावल्याचं पाहायला मिळतयं. दरम्यान या शटडाऊनमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाची देखील वाट पाहावी लागणार आहे.
मुंबई : महासत्ता असेलेल्या अमेरिकेमध्ये (America) शटडाऊनचा (Shutdown) धोका पुन्हा एकदा वाढला आहे. दरम्यान जो बायडेन (Joe Biden) यांच्या सरकारला 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती मुदत आता संपत आल्याने 1 ऑक्टोबरपासून अमेरिका बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या शटडाऊनच्या काळामध्ये सर्व प्रकारची सरकारी कामे ठप्प होतात.
सध्या अमेरिकेत निवडणुकांचे वार वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक प्रकारची राजकिय खलबतं देखील होत असल्याचं चित्र सध्या अमेरिकेमध्ये आहे. त्यातच अमेरिकेतील सरकारला निधी देणारे फेडरल आर्थिक वर्ष हे 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे याआधी सरकारला निधीची मंजूरी मिळवण्यासाठी विरोधकांची संमती घ्यावी लागेल. पण जर विरोधकांनी या निधी योजनेला संमती दिली नाही तर मात्र 1 ऑक्टोबरपासून अमेरिका शटडाऊन होऊ शकते. यामुळे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत मोठं आर्थिक संकट उभं राहण्याची शक्यता आहे.
शटडाऊनची कारणं काय?
अमेरिकेतील सरकार हे आपल्या महत्त्वाच्या योजना राबवण्यासाठी आवश्यक असणारा निधी हा कर्जाच्या स्वरुपात घेत असते. पण ही निधी कर्जाच्या स्वरुपात घेण्यासाठी त्यांना संसंदेची म्हणजेच अमेरिकेतील काँग्रेसची मंजुरी आवश्यक असते. दरम्यान यंदाच्या आर्थिक वर्षात अमेरिकेच्या आर्थिक गणितात त 2 लाख कोटी डॉलरची तफावत आली आहे. ही खूप मोठी महसूल तूट असल्याचं सांगण्यात येत आहे. ही तफावत म्हणजेच सरकारची कमाई आणि खर्चात आलेली तफावत आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत ही तफावत मोठी असल्याचं देखील सांगण्यात येतय.
पण यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की सरकारच्या कमाईपेक्षा सरकारचा खर्च अधिक होत असल्याचं यामधून स्पष्ट झालं आहे. त्यातच इतकी तूट ही कोरोना पूर्व काळात देखील आली नव्हती. तसेच त्या काळात जी महसूल होता, तोच मागील तीन वर्षांमध्ये कायम ठेवण्यात अमेरिकेच्या सरकारला यश आलं होतं. पण यंदाच्या वर्षात मात्र ही तूट जाणवली. यामुळे सरकारला कर्जावर अतिरिक्त व्याज द्यावे लागत आहे. त्यामळे सरकारची आर्थिक गती मंदावली असून हे संकट ओढावल्याचं सांगण्यात येत आहे.
शटडाऊनची वेळ का येईल?
अमेरिकेतील निधीची योजना मंजूर करण्यासाठी संसदेची मंजूरी घ्यावी लागते. पण संसदेची मंजूरी घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सहमती आवश्यक असते. म्हणजचे जो बायडेन यांच्या सरकारला अर्थातच डेमोक्रॅटिक पक्षाला आणि विरोधी पक्षाला म्हणजेच रिपब्लिकन पक्षाला परस्पर संमती आवश्यक असते. पण जर ही संमती मिळाली नाही तर 1 ऑक्टोबरपासून देशात शटडाऊनची सुरुवात होऊ शकते.
शटडाऊन दरम्यान काय होईल?
शटडाऊनदरम्यान अमेरिकेतील सर्व सरकारी कामे ठप्प होतात. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन देखील मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते. अनेक योजनांना टाळं लागण्याची शक्यता देखील यादरम्यान असते. तसेच लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळवण्यास देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण या शटडाऊन दरम्यान अमेरिकेतील लष्कर हे त्यांच्या पदांवर कार्यरत राहील. दरम्यान या शटडाऊनचा कोणताही परिणाम अमेरिकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर होणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक कर्ज भरण्यास देखील कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :
India-Canada : भारतानं फटकारल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान नरमले! आता म्हणतायत, भारतासोबत संबंध महत्वाचे