एक्स्प्लोर
Advertisement
सीरियात शाळेवर हवाई हल्ला, 22 मुलांचा मृत्यू
दमिश्क : सीरियामधील इदलिब प्रातांत झालेल्या हवाई हल्ल्यात 22 विद्यार्थी आणि 6 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. कट्टरपंथीयांच्या ताब्यातील हास गावात हा हल्ला झाला.
शाळेच्या आवारातच हवाई हल्ला झाल्याने मृतांमध्ये शाळकरी मुलं आणि शिक्षकांचा समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या हल्ल्यामागे रशियाच्या लढाऊ विमानांचा हात असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सीरियाच्या सरकारी टीव्ही चॅनलवर या हल्ल्याची माहिती देताना म्हटलं आहे की, कट्टरपंथीयांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला असून, त्यात कट्टरपंथीय ठार झाले आहेत. मात्र शाळकरी मुलांच्या मृत्यूबाबत उल्लेख केलेला नाही.
दरम्यान, इदलिब परिसर कट्टरपंथीयांच्या ताब्यात आहे. याआधीही या परिसरात अनेकवेळा हवाई हल्ले झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement