एक्स्प्लोर
अफगाणिस्तानात गायिकेच्या ड्रेसवरुन वादंग, संतप्त गायिकेने ड्रेस जाळला
काबुल : अफगाणिस्तानमधील गायिका आणि सेलिब्रिटी अरयाना सईद सध्या जोरदार चर्चेत आहे. मात्र तिच्या चर्चेत येण्याचं कारणही आश्चर्यकारक आणि विचार करायला लावणारं आहे.
पॅरीसमध्ये 13 मे रोजी झालेल्या कॉन्सर्ट दरम्यान अरयानाने स्किन कलरचा टाईट ड्रेस घातला होता. यावरुन अनेक धार्मिक संस्थांनी तिच्यावर टीका केली. ‘अफगानिस्तानमध्ये जर टाईट ड्रेस वादाचा मुद्दा असेल, तर मी त्याला जाळून टाकायला कमी करणार नाही’, असं म्हणत तिने तो ड्रेस आगीच्या हवाली केला.
अरयाकाने 24 मे रोजी आपला विवादीत ड्रेस जाळून टाकला. त्याचा व्हिडीओ देखील तिने फेसबूकवर शेअर केला. या व्हिडिओवरुनही वाद निर्माण झाला आहे.
महिलेने संपूर्ण नग्न होणं इस्लाम धर्मात निषेधार्ह आहे. अरयानाने तो ड्रेस घालणं चूकच होतं, असं काहींचं मत आहे. तर हा ड्रेस जाळण्यापेक्षा त्या लोकांच्या मानसिकता जाळणं जास्त आवश्यक असल्याची प्रतिक्रिया काहींनी दिली आहे.
दरम्यान या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत. समाजातलं आणि जगातलं स्त्रियांचं स्थान अजूनही दुय्यम आहे का? केवळ एका ड्रेसमुळे धार्मिक भावना दुखावल्या जाण्याइतकी आपली विचारसरणी खालावली आहे का? असे अनेक सवाल जगभरातून उपस्थित केले जात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement