Afghanistan Earthquake : भूकंपातून सावरत असलेलं अफगाणिस्तान पुन्हा हादरलं! 6.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के
Afghanistan Earthquake : भूकंपातून सावरत असलेलं अफगाणिस्तान पुन्हा हादरलं आहे. अफगाणिस्तानमध्ये बुधवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचे झटके बसले आहेत.

Afghanistan Earthquake Updates : भूकंपातून सावरत असलेलं अफगाणिस्तान (Afghanistan) पुन्हा एकदा हादरलं आहे. बुधवारी पहाटे अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल असल्याची माहिती समोर आली आहे. 11 ऑक्टोबरला पहाटे अफगाणिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. अमेकिन भूगर्भ संशोधन संस्था USGS च्या माहितीनुसार, हैरात प्रांताच्या आसपासच्या परिसरात हा भूकंप झाला आहे.
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप
बुधवारी पहाटे पश्चिम अफगाणिस्तानात 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. याच भागात शनिवारी 7 ऑक्टोबरलाही भूकंपाचे हादरे बसले होते, ज्यामध्ये हजारो लोकांनी प्राण गमावले. अफगाणिस्तानातच्या स्थानिक वेळेनुसार पहाटे 5:10 वाजता भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहराच्या उत्तरेस 29 किलोमीटर अंतरावर होता, अशी माहिती युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (US Geological Survey) ने दिली आहे.
Notable quake, preliminary info: M 6.3 - 28 km NNW of Herāt, Afghanistan https://t.co/uIPpxcmo6K
— USGS Earthquakes (@USGS_Quakes) October 11, 2023
आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू
अफगाणिस्तानमध्ये गेल्या आठवड्यात शनिवारी, 7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा भूकंप दोन दशकांतील सर्वात भीषण भूकंप असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. अफगाणिस्तान अद्याप या भूकंपातून सावरलेला नाही.
भूकंपग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर
ढिगाऱ्यांखाली अडकलेल्यांचं शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असताना बुधवारी पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहेत. UN ने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपासून स्वयंसेवक आणि बचावकर्ते भूकंपग्रस्त भागात बचावकार्य करत आहेत. या भूकंपामुळे अनेक गावं उदध्वस्त झाली असून 12,000 हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
तालिबान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर रोजी 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हेरात प्रांतात असंख्य घरे उध्वस्त झाली असून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही या भागात शोध आणि बचावकार्य सुरु आहे. अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडे आलेल्या या भूकंपामध्ये 2500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
Afghanistan Earthquake : जाको राखे साईंया मार सके न कोय... 36 तासांनी ढिगाऱ्याखालून चिमुकली सुखरूप बचावली; पाहा VIDEO
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
