(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fly Dubai : काठमांडूवरुन दुबईला जाणाऱ्या विमानाला हवेतच आग, विमानाचे सुरक्षित लँडिंग
Fly Dubai Flight Fire: : काठमांडू विमानतळावरून दुबईला जात असताना विमानाला आग लागली होती. आता या विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आलं आहे.
Fly Dubai : काठमांडू विमानतळावरून दुबईला जात असताना उड्डाण घेताच फ्लाय दुबई विमानाला 576 (बोईंग 737-800) आग लागल्याची घटना घडली. नंतर विमान हवेतच घिरट्या घालू लागलं. या विमानाचे आता सुरक्षित लँडिंग झाल्याची माहिती आहे. या विमानाचे दुबईमध्ये लँडिंग करण्यात आलं आहे. यामध्ये 120 नेपाळी नागरिक तर 49 परदेशी प्रवासी असल्याची माहिती आहे.
हवेत असताना या विमानाला आग लागली, परंतु ते रडारमध्ये असल्याने त्याच्याशी संपर्क सुरू होता. त्यानंतर हे विमान सुरक्षितपणे दुबई विमानतळावर लँड करण्यात आलं.
A flydubai spokesperson: flydubai flight FZ 576 from Kathmandu Airport (KTM) to Dubai International (DXB) experienced a bird strike during takeoff from Kathmandu.
— Dubai Media Office (@DXBMediaOffice) April 24, 2023
After following standard procedure the flight will to continue as normal to Dubai and is scheduled to land in DXB at…
काठमांडू विमानतळावरून दुबईला उड्डाण घेतल्यानंतर फ्लाय दुबईच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आलं आहे. नेपाळ नागरी उड्डाण प्राधिकरणाने सांगितले की फ्लाय दुबई फ्लाइट 576 (बोईंग 737-800) सुरक्षितपणे लँड झालं आहे. हे विमान काठमांडूहून दुबईला जात होतं. काठमांडू विमानतळाचे कामकाज आता पूर्वपदावर आले आहे.
काठमांडू विमानतळावरून उड्डाण घेत असताना आग लागलेल्या फ्लाय दुबई विमानाला आता दुबईला पाठवण्यात आल्याचे नेपाळच्या पर्यटन मंत्र्यांचे म्हणणे आहे.