एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
67 व्या वर्षी लग्न करुन 70 व्या वर्षी पिता
ढाकाः पितृत्व लाभणं हा कोणत्याही पित्यासाठी एक सुखद अनुभव असतो. मात्र कोणाला जर वयाच्या 70 व्या वर्षी पितृत्व लाभलं तर त्याचा आनंद काही वेगळाच म्हणावा लागेल.
बांगलादेशचे रेल्वे मंत्री मुजीबुल हक यांना असाच आनंद लाभला आहे. हक यांना वयाच्या 70 व्या वर्षी कन्यारत्न झाला आहे. शनिवारी एका रुग्णालयात हक यांची पत्नी मुनिफा यांनी मुलीला जन्म दिला. मुलगी आणि आई दोघेही ठिक आहेत, असं हक यांनी स्वतः सांगितलं आहे.
29 वर्षीय तरुणीसोबत केलं लग्न
हक यांनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी वयाच्या 67 व्या वर्षी लग्न केल्यामुळे हक हे काही वर्षांपूर्वी चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर आता वयाच्या 70 व्या वर्षी पिता बनल्यामुळे ते चर्चेत आहेत. हक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी हनुफा अख्तर रिक्ता या 29 वर्षीय तरुणीसोबत लग्न केलं होतं.
संबंधित बातम्याः
67 वर्षीय रेल्वेमंत्र्यांचा 29 वर्षीय तरुणीशी विवाह
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement