एक्स्प्लोर
पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर, भारताच्या कारवाईत तीन पाकिस्तानी सैनिक ठार
गेल्या काही दिवसांपासून एलओसीजवळ सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या भारताने मुसक्या आवळल्या आहेत.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून एलओसीजवळ सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या भारताने मुसक्या आवळल्या आहेत. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये पाकिस्तनचे तीन सैनिक मारले गेल्याचा पाकिस्तानने दावा केला आहे. सीमेपलिकडून वारंवार गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानला भारताने कडक इशारा दिल्यानंतरही पाकिस्तानने गोळीबार थांबवला नाही. परिणामी भारताचा कडक पावलं उचलावी लागली.
काल पंजाबजवळच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. यावेळी भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. मोठी कारवाई करत भारताने नियंत्रण रेषेपलिकडे असणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या सात चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. भारताच्या प्रत्युत्तरात तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. सुभेदार मोहम्मद रियाज़, लान्स हवालदार अजीज उल्लाह आणि शिपाई मन्सीब अशी मृत पावलेल्या पाकिस्तानी सैनिकांची नावे आहेत.
काल (सोमवार, 01 एप्रिल)पाकिस्तानी सैन्याने पुंछमधील शाहपूर-किरनी सेक्टर, मनकोट सेक्टर आणि कृष्णा घाटी परिसरात बराच वेळ गोळीबार केला होता. या हल्ल्यात भारतीय सीमा सुरक्षा दलाचा एक इन्सपेक्टर शहीद झाला असून एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. त्याचबरोबर चार जवान आणि 14 स्थानिक लोक जखमी झाले. भारताने आज त्याचा बदला घेतला असल्याचे बोलले जात आहे.
पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले होते. या जवानांना जवळच्या पुंछ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. उर्वरीत चार जवानांवर उपचार सुरु आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारानंतरही पाकिस्तानने गोळीबार थांबवला नाही. परिणामी आज भारताने मोठी कारवाई करत पाकिस्तानच्या सात चौक्या उध्वस्त केल्या, त्यासोबतच तीन पाकिस्तानी सैनिकांना मारले आहे.
Pakistan Army says 3 soldiers dead in Indian firing, Indian Army sources say toll higher Read @ANI story | https://t.co/69fsHcVX80 pic.twitter.com/oOnjEz4zMU
— ANI Digital (@ani_digital) April 2, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement