एक्स्प्लोर
सौदीच्या कातिफ आणि मदिनात मशिदीबाहेर स्फोट, चौघांचा मृत्यू
मदिना : सौदी अरेबियाची दोन शहरं बॉम्बस्फोटाने हादरली. मुस्लीम धर्मियांचं पवित्र ठिकाण असलेल्या मदिना आणि कातिफमधील मशिदीजवळ स्फोट झाले. दोन ठिकाणी झालेल्या या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला.
पहिला बॉम्बस्फोट कातिफमध्ये झाला. तर दुसरा स्फोट मदिनात झाला. एका आत्मघाती हल्लेखोराने मोहम्मद पैगंबरांच्या मशिदीजवळ स्वत:ला स्फोट करुन उडवलं.
ऐन इफ्तार पार्टीवेळी झालेल्या या स्फोटाने मदिनामध्ये एकच खळबळ उडाली. याठिकाणी एक व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना दिसला. त्यावेळी त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला असता त्याने स्वतःला स्फोटाने उडवून दिलं.
मदिना मुस्लीमांचं सर्वात पवित्र ठिकाण आहे. याआधी सोमवारी सकाळी सौदी अरेबियाच्याच जेद्दाह शहरात अमेरिकन दूतावासाजवळ आत्मघाती हल्ला झाला होता. या स्फोटात हल्लेखोर ठार झाला. 4 जुलै रोजी अमेरिकन नागरिक स्वातंत्र्यदिन साजरा करतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement