Frog and Snake : बेडूक आणि सापाच्या 'या' दोन प्रजातींचा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका, 1.20 लाख कोटी रुपयांचे नुकसान
मागील काही वर्षापासून बेडूक आणि सापाच्या दोन प्रजातींमुळं खूप मोठा फटका अर्थकारणाला बसला आहे. या बेडूक आणि सापाच्या प्रजातींमुळं जागतिक अर्थव्यवस्थेचं 1.20 लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे.
Frog and Snake : दरवर्षी जगभरात वेगवेगळ्या प्रजातींच्या किटकांमुळे (insect) शेती पिकांचं नुकसान होत असते. त्याचा मोठा फटका अर्थकारणाला बसतो. मात्र, मागील काही वर्षापासून बेडूक (Frog) आणि सापाच्या (Snake ) दोन प्रजातींमुळं खूप मोठा फटका अर्थकारणाला बसला आहे. या बेडूक आणि सापाच्या प्रजातींमुळं जागतिक अर्थव्यवस्थेचं 1.20 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. अमेरिकन बुलफ्रॉग आणि ब्राऊन ट्री स्नेक या प्रजाती नुकसानीस कारणीभूत आहेत. 1986 ते 2020 पर्यंत या दोन प्रजातींमुळ जागतिक अर्थव्यवस्थेचं 1.20 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीसह पर्यावरणाची हानी देखील या बेडूक आणि सापाच्या प्रजातींमुळं झाली आहे. तसेच वीज खंडित होण्याच्या समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. भविष्यात अशा आक्रमक प्रजातींना रोखण्यासाठी अधिक गुंतवणूक करण्याची गरज असल्याचं देखील या अभ्यासात सांगण्यात आलं आहे. अभ्यासकांनी दिलेल्या रिपोर्ट्समध्ये लिथोबेट्स कॅटेसबियनस म्हणून ओळखल्या जाणार्या तपकिरी-हिरव्या बेडकाचा युरोपमध्ये सर्वाधिक परिणाम झाला आहे. ब्राऊन ट्री सापामुळं देखील मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. गुआम आणि मारियाना बेटांसह पॅसिफिक बेटांवर यासापांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. याचा मोठा फटका पर्यावरण आणि पिकांना बसल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. या सापांच्या प्रजाती वीज देखील खंडीत करत असल्याचं समोर आलं आहे. या सापांच्या प्रजातींचे आक्रमण कमी करण्याची गरज असल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे.
अमेरिकन बुलफ्रॉग आणि ब्राऊन ट्री स्नेक या दोन आक्रमक प्रजाती आहेत. याचा शेती पिकांवर मोठा परिणाम झाल्याचे अभ्यासकांनी म्हटलंआहे. 1986 ते 2020 दरम्यान या प्रजातींचा पिकांवर आणि पर्यावरणावर झालेल्या परिणांमाचा अभ्यास करण्यात आला आहे. त्या अभ्यासातून या गोष्टी समोर आल्या आहेत. 1.20 लाख कोटींचे जागतिक अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं आहे. पाळीव प्राण्यांचा व्यापार हा अशा प्रजातींचा प्रसार होण्याचा मुख्य मार्ग आहे. विशेषत: विदेशी साप मिळवायचा काही देशात प्रयत्न होत असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Hump Nosed Pit Viper : सिंधुदुर्गात आढळला दुर्मिळ नाकाड्या चापडा साप; तिलारीच्या घनदाट जंगलांमध्ये वावर
- Viral News : अरेच्चा! सापांची वरमाला घालत बांधली लग्नगाठ, विचित्र लग्नाचा हा व्हिडीओ एकदा पाहाच