एक्स्प्लोर

Hump Nosed Pit Viper : सिंधुदुर्गात आढळला दुर्मिळ नाकाड्या चापडा साप; तिलारीच्या घनदाट जंगलांमध्ये वावर

Hump Nosed Pit Viper : सिंधुदुर्गातील तिलारी खोऱ्यात दुर्मिळ नाकाड्या चापडा साप आढळून आला आहे.

Snake Hump Nosed Pit Viper : कोकणात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळते. सिंधुदुर्गाला कोकणातील जैवविविधता भांडार म्हणून ओळखले जाते. याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात सापाची दुर्मिळ प्रजाती आढळली आहे. याच तिलारीच्या खोऱ्यात विविध प्राणी, पक्षी, वनस्पती आहेत. नाकाड्या चापडा (Hump Nosed Pit Viper) या सापांच्या दुर्मीळ प्रजातीची तिलारी मधील केर-भेकुर्ली भागात सिंधुदुर्गातील पहिलीच नोंद झाली आहे. वन्यजीव अभ्यासक संजय सावंत, तुषार देसाई व उदय सातार्डेकर हे जंगलात वन्य अभ्यासाकरिता गेले होते. त्यावेळी त्यांना ही दुर्मीळ प्रजाती आढळून आली.

Hump Nosed Pit Viper अर्थात नाकाड्या चापडा विषारी सापांमधील जगभरात प्रसिद्ध असलेल्या वर्गातील व्हायपर सापांचा अत्यंत दुर्मीळ साप केर-भेकुर्ली येथे दिसून आला. दक्षिण-पश्चिम भारत आणि श्रीलंका येथील स्थानिक प्रजाती आहे. या सापांचे लांबलचक सुळेदात भक्ष्याच्या शरीरात खोलवर दंश करून आतपर्यंत विष सोडतात. हे विष सहसा रक्तभिसरण संस्था आणि स्नायुंवर परिणाम करतात. 

या सापांचे शरीर जाडसर असते, लांबी सहसा कमी असून डोके काहीसे चपटे आणि त्रिकोणी असते. या सापांमध्ये सापांच्या तोंडावर असणारी दोन उष्णता संवेदनाग्रहण करणारी छिद्रे आजूबाजूला असलेल्या उष्ण रक्ताचे सस्तन प्राणी, पक्ष्यांची हालचाल सहज टिपू शकतात. आपले डोके आजूबाजूला फिरवून जाणवणाऱ्या उष्णतेप्रमाणे ते मध्याची योग्य दिशा सहज ओळखतात. या सापांच्या शरीरावर गडद तपकीरी किंवा राखाडी रंगाचे त्रिकोणी आकाराचे डाग असतात. 

हा साप इतर पिट व्हायपर सारखा हा झाडावर न राहाता खाली जमिनीवरच आढळतो. पालापाचोळ्यामध्ये झाडांच्या मुळांजवळ, दगडांखाली साप दिसून येतो. मात्र, हा साप अतिदाट जंगलात आढळतो. उत्तेजीत झाल्यावर तो आपली लालसर पिवळसर उठावदार रंगाच्या शेपटीची जोरदार हालचाल करतो. मादीला आकर्षित करण्यासाठीसुद्धा त्याला या सवयीचा उपयोग होतो. यापूर्वी हा साप चोर्ला घाट, गोव्यातील केरी सत्तरी भाग तसेच ठराविक उंचीवर आढळून आला. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सापाची  पहिलीच नोंद आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ambadas Danve on Eknath Shinde : टँकरमध्ये पाणू कुठून टाकणार? अजित पवारासारखं आणणार का?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Embed widget