Savita Halappanavar : आयर्लंडमधल्या गर्भपाताच्या 'त्या' घटनेला 10 वर्ष पूर्ण; सविता हलप्पनवार यांच्या स्मरणार्थ ठिकठिकाणी कॅंडल मार्चचे आयोजन
Savita Halappanavar : आयर्लंडमध्ये गर्भपातास नकार दिल्यानंतर मरण पावलेल्या भारतीय वंशाच्या दंतचिकित्सक सविता हलप्पनवार यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त डब्लिनमध्ये कॅंडल मार्च काढण्यात आला.
![Savita Halappanavar : आयर्लंडमधल्या गर्भपाताच्या 'त्या' घटनेला 10 वर्ष पूर्ण; सविता हलप्पनवार यांच्या स्मरणार्थ ठिकठिकाणी कॅंडल मार्चचे आयोजन 10 years since abortion incident in Ireland memory of Savita Halappanwar marathi news Savita Halappanavar : आयर्लंडमधल्या गर्भपाताच्या 'त्या' घटनेला 10 वर्ष पूर्ण; सविता हलप्पनवार यांच्या स्मरणार्थ ठिकठिकाणी कॅंडल मार्चचे आयोजन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/29/a41b801afacca7435823d6b8f553c2281667044149556358_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Savita Halappanavar : आयर्लंडमध्ये (Ireland) गर्भपातास नकार दिल्यानंतर या दिवशी मरण पावलेल्या भारतीय वंशाच्या दंतचिकित्सक सविता हलप्पनवार (Savita Halappanavar) यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त डब्लिनमध्ये (Dublin) कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले. 31 वर्षीय सविताचा 28 ऑक्टोबर 2012 रोजी सेप्टिसिमियामुळे मृत्यू झाला. गर्भपात करण्यास नकार दिल्यानंतर तिला गर्भधारणेदरम्यान संसर्ग झाला होता. तिच्या मृत्यूमुळे देशभरात गर्भपात कायद्यासाठी कडक निषेध आणि संताप व्यक्त करण्यात आला होता. आणि त्यानंतर आयर्लंडमध्ये गर्भधारणा संपुष्टात आणण्यावर बंदी घालणारी आठवी दुरुस्ती रद्द करण्यात आली.
आयर्लंडच्या नॅशनल कौन्सिल फॉर वुमन (NWCI) च्या संचालक ओरला ओ'कॉनर यांनी आयरिश टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, "सविताचा मृत्यू लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे." NWCI आयर्लंडमधील समाजवादी स्त्रीवादी गट रोसा यांनी विद्यार्थ्यांच्या युनियनसह काढलेल्या मोर्चाला पाठिंबा देत आहे.
रोझाच्या सदस्या रुथ कॉपिंगरने आयरिश म्हणाल्या, "हा मोर्चा खूप महत्वाचा आहे. "आम्ही लोकांना सविता लक्षात ठेवण्याचे आवाहन करतो आणि गर्भपाताची मागणी करणारी कोणतीही स्त्री मरू नये असे आम्ही सांगतो". कायद्यात आठवी दुरुस्ती रद्द करूनही, आगामी मोर्चाच्या आयोजकांनी सांगितले की, आयर्लंडमध्ये गर्भधारणा संपुष्टात आणण्याच्या तरतुदीमध्ये अजूनही समस्या आहेत.
पॉल सीनी या आयर्लंडमधील ट्विटर यूजरने लिहिले की, सविता अजूनही आमच्या स्मरणात आहे. तिच्या भयानक मृत्यूला आज दहा वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र, या ठिकाणी परिस्थिती अजूनही बदलली नाही. आयर्लंड बेटावरील अनेक गर्भवती महिलांना अजूनही आरोग्य सेवेच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
सविता यांच्या स्मरणार्थ लंडनमधील आयरिश दूतावासातही एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कारा सॅन्क्वेस्ट, क्वीन्स पार्क, वेस्टमिन्स्टरच्या लेबर कौन्सेलर यांनी ट्विट केले की, आयर्लंड, उत्तर आणि दक्षिणेतील महिला आणि मुलींना अजूनही गर्भपातासाठी इंग्लंडला जाण्यास भाग पाडले जात आहे.
जुलै 2008 मध्ये सविता बेळगाव, कर्नाटक येथून गॅलवे, आयर्लंड येथे आली. जुलै 2012 मध्ये, तिला आयर्लंडमध्ये दंतचिकित्सक सराव करण्याचा परवाना देण्यात आला आणि त्याच महिन्यात, ती गर्भवती असल्याचे कळल्यावर तिला आनंद झाला. मात्र, द गार्डियन मधील वृत्तानुसार, सविता आणि त्यांच्या पतीने तीनदा गर्भपात करण्याची विनवणी करूनसुद्धा तो करण्यात आला नाही. याउलट त्यांना असे सांगण्यात आले होते की, हा एक कॅथलिक देश असल्याने गर्भपात करू शकत नाही. तसेच गर्भ अजून जिवंत असल्याने ते गर्भधारणा समाप्त करू शकत नाहीत.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)