एक्स्प्लोर

Nylon Manja : नायलॉन मांजाने कापला महिलेचा पाय, जखमेवर तब्बल 45 टाके; जीवघेणा खेळ कधी थांबवणार?

Nylon Manja Accident : अकोला शहरातल्या जुने शहर परिसरामधील गुरुदेव नगर येथे घडली आहे. या परिसरातील रहिवाशी असलेल्या कलावती मराठे या महिलेच्या पायात चायना मांजा अडकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

Nylon Manja Accident Akola : मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात पतंगबाजी केली जाते. मात्र हे करत असताना प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या वापर नागरिकांच्या जिवावर उठला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशा अपघाताच्या घटना घडल्या असून यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. अशीच एक अपघाताची घटना अकोला शहरातल्या जुने शहर परिसरामधील गुरुदेव नगर येथे घडली आहे. या परिसरातील रहिवाशी असलेल्या कलावती मराठे या महिलेच्या पायात चायना मांजा अडकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. यात या महिलेचा पाय मांज्याने इतका चिरला गेला आहे की त्यांना उपचारा दरम्यान चक्क 45 टाके पडले आहेत. राज्यात एकीकडे नायलॉन मांजाच्या वापर, साठवणूक आणि विक्रीवर बंदी असतानाही या मांजाचा सर्रास वापर होत असल्याचे पुढे आले आहे. तर एलसीबी आणि पोलीस विभाग चायना मांज्यावर कारवाई करत असतांना सुद्धा चायना मांज्या नागरिकांकडे आला तरी कसा असा प्रश्न विचारला जात आहे. 

वैजापूर पोलिसांनी 93 हजारांचा नायलॉन मांजा केला जप्त 

काही तासांवर येऊन ठेपलेल्या संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पतंग राज्यभरासह देशभरात उडवले जातात. मात्र यात जो नायलॉन मांजा वापरण्यात येतो यामुळे अनेक घटना घडून अनेकांनी आपला जीव देखील गमावला आहे. त्यामुळे प्रशासनाने नायलॉन माझ्या विक्री करण्यास बंदी घातली असताना देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर पोलिसांनी अवैधरित्या माझ्या विक्री करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. यात त्याच्याकडून 93 हजार सहाशे रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करत वैजापूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात सक्त कारवाई मोहीम हाती घ्यावी- डॉ.नीलम गोऱ्हे

या वर्षाची मकरसंक्रांत नायलॉन मांजा विरहित साजरी व्हावी यासाठी नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात सक्त कारवाई मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश विधान परिषद उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे  यांनी प्रशासनातील वेगवेगळ्या विभागाला दिले आहेत. राज्यातील जिल्हाधिकारी,महापलिका आयक्त,पोलीस प्रशासन,प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासोबत आज उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ऑनलाईन बैठक घेतली. त्यावेळी या विभागांना निर्देश दिले आहेत. सध्या ऑनलाईन मांजा खरेदी वाढत आहे. अश्या  नायलॉन मांजा विक्रीवर कडक निर्बंध आणण्यासाठी पथक नेमत कारवाई करण्याच्या सूचनाही डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

दुचाकी स्वाराचा नायलॉन मांजाने गळा कापल्याची धक्कादायक घटना

नाशिकच्या वडाळनाका भागात कामावरून घरी परतत असताना एका दुचाकी स्वाराचा नायलॉन मांजाने गळा कापल्याची धक्कादायक घटना घडलीये. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुशरन मोहसीन सय्यद असं जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे... मुशरन सय्यद यांच्या जखमेवर तब्बल 40 टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मेन रोड येथील कापड दुकानात काम करून मुसरन हा सायंकाळी दुचाकीवरून वडाळा नाका परिसरात जात असताना त्याचा गळ्याला नायलॉन अडकला, रक्तबंबाळ गंभीर जखमी मुसरन रस्त्यावर कोसळला... त्याच अवस्थेत नागरिकांनी त्याला जवळच्या खाजगी रुग्णाला दाखल केले... डॉक्टर तात्काळ उपचार करत जखमेंवर 40 टाके घातल्याने त्याचा जीव असल्याची माहिती नातेवाईकांनी दिलीये.... पोलिसांकडून नायलॉन माझ्या विरोधात सुरू असलेल्या कारवाई तुडकी पडत असल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केला आहे. तर या नायलॉन मांजावर लवकरात लवकर बंदी घालून नायलॉन मांजा हद्दपार करा अशी मागणी होत आहे.

हे ही वाचा 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Narendra Patil on Ajit Pawar and Chhagan Bhujbal: अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Narhari Zirwal On Parth Pawar : मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडून पार्थ पवार यांचं समर्थन
Parth Pawar Pune Land Scam: पुणे कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी 8 आरोपींविरोधात गुन्हा दाखल
Manoj Jarnage On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंकडून माझ्या हत्येचा कट; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा
Manoj Jarange On Dhananjay Munde: 'मला गाडीने चिरडून मारायचा कट होता', जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवली
Dhananjay Munde PC : माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप, मुंडेंनी थेट नार्को टेस्टचीच मागणी केली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Narendra Patil on Ajit Pawar and Chhagan Bhujbal: अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल; पार्थ पवार जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा खोचक टोला
अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल; पार्थ पवार जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा खोचक टोला
Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
Parth Pawar Land Scam : पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
Nashik Leopard Attack: पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
Embed widget