Chhatrapati Sambhajinagar :दुर्दैवी! कटलेली पतंग पकडण्याचा नादात शाळकरी मुलाचा मृत्यू; परिसरात शोककळा
छत्रपती संभाजीनगरच्या बाळापुर परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कटलेली पतंग पकडण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय युवकांचा नालीमध्ये पडून दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या बाळापुर परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात एका 14 वर्षीय मुलगा शाळा सुटल्यानंतर घरी न जाता रस्त्यामध्ये कटलेला पतंग पकडण्यासाठी त्या पतंगाच्या माघे धावत सुटला. दरम्यान, पतंगीच्या दिशेने धावत असताना खाली लक्ष नसताना तिथं रस्त्याच्या कडेला असल्याले नालीमध्ये पडला. या अपघातात या मुलांचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पवन शांतीकुमाल राठोड असे मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मकर संक्रांतीला आता अवघे काही दिवस उरले आहे. या सणाच्या निमित्याने मोठ्या प्रमाणात पतंग उडवल्या जातात. असे असतानाच या काळात अनेक अपघात देखील घडत असतात. अशीच एक दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरच्या बाळापुर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
नायलॉन मांजाने कापला दुचाकीस्वाराचा गळा, जखमेवर तब्बल 40 टाके,
नाशिकच्या वडाळ नाका (Wadala Naka) भागात कामावरून घरी परतत असताना एका दुचाकीस्वाराचा नायलॉन मांजाने (Nylon Manja) गळा कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहे. मुशरन मोहसीन सय्यद असं जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुशरन सय्यद हे मेनरोड (Main Road) येथील कापड दुकानात कामाला आहेत. मुसरन हे सायंकाळी दुचाकीवरून वडाळा नाका परिसरात जात असताना त्यांच्या गळ्याला नायलॉन अडकला. त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. त्याच अवस्थेत नागरिकांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
नायलॉन मांजा विकाल तर जेलमध्ये जाल, पोलीस अॅक्शन मोडवर
मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक आणि वापरल्यास पोलीस प्रशासन कारवाई करणार आहे. मकरसंक्राती निमित्त पतंगोत्सवाची सर्वत्र सुरू असते. अनेकदा या मांजामुळे प्राणी पक्षी आणि मनुष्याच्या जिवीतास हानी पोहचल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हा मांजा वापरण्यास बंदी असतानाही अनेक व्यापारी अनधिकृतरित्या वापरतात आणि विक्री करतात. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. नायलॉनचा मांजा विकणाऱ्यांविरोधात आणि मांजा वापरणार्या मुलांच्या पालकांविरोधात पोलीसांकडून कारवाईचा बडगा उगारत भारतीय न्याय संहितेच्या 110 कलमांतर्गत कारवाई केली जाणार आहे. गेल्या 30 दिवसांसाठी पोलिसांनी हा अद्यादेश काढला असून उल्लघंंन करणार्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं पत्र पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी काढलं आहे
हे ही वाचा