High Court on HSRP Number Plate : राज्यातच सर्वात महाग HSRP नंबरप्लेट का? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा राज्य सरकारला सवाल
Nagpur News : राज्यातच सर्वात महाग हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट(HSRP)का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केला आहे.

Nagpur News : राज्यातच सर्वात महाग हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट(HSRP)का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केला आहे. न्यायालयात दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने राज्य सरकारला हा प्रश्न विचारला आहे. दरम्यान, या प्रकरणावर राज्य परिवहन आयुक्तांना पुढील तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश देखील नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहे.
राज्यातच सर्वात महाग HSRP नंबरप्लेट का?
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार नवीन नंबरप्लेटसाठी महाराष्ट्रात दुचाकीला 450 रुपये दर आहे. तर हेच दर आंद्रप्रदेशमध्ये 245 रुपये इतके आहे. गुजरातमध्ये हा दर 160 रुपये आणि गोव्यात 155 रुपये इतका असल्याचे सांगितले आहे. चारचाकीसाठी महाराष्ट्रात 745 रुपये खर्च येत आहे. तर आंधरप्रदेशमध्ये हा दर 619रुपये , गुजरातमध्ये 560 रुपये व गोव्यात 203 रुपये खर्च येत असल्याचे सांगितलं जातंय. मात्र राज्यातच हा दर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात महाग असल्याचे संगत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेटसाठी (HSRP) राज्यात ज्यादा दर का? असा सवाल न्यायालयाने विचारला आहे.
सावधान! HSRP नंबर प्लेट काढताना तुम्हाला गंडा घातला जातोय?
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात एचएसआरपी नंबर प्लेट काढणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. सध्या करोडो वाहन चालक एचएसआरपीची ऑनलाईन नोंदणी करण्यात व्यस्त आहेत. अन याचाच फायदा घेत अनेक ठग आता तुम्हाला ऑनलाईन गंडा घालण्याच्या तयारीत आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाकडे अशा तक्रारी ही प्राप्त झाल्यात. यासाठी अनेक ठगांनी शासकिय वेबसाईटला साधर्म्य असणार्या बनावट वेबसाईटची निर्मिती केलीये.त्या वेबसाईटवरुन तुम्ही एचएसआरपी नंबर प्लेटची नोंदणी केली, तर त्याद्वारे तुमचं नोंदणी शुल्क हडपले जात आहे.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) सक्तीची करण्यात आलेली आहे. . त्यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सींची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया करून तसेच आपल्या शहरातील असलेल्या अधिकृत केंद्रामध्ये ती बसवून घेता येणार आहे.
01. त्यासाठी तुम्हाला गुगलवर HSRP Number Plate Maharashtra असं सर्च करायचं आहे. त्यानंतर सर्वात वर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची वेबसाईट transport.maharashtra.gov.in आली असेल. त्यावर क्लिक करा..
02. त्यानतंर तुमच्या समोर होम पेज आलं असेल...
03. आता तुमच्यासमोर Apply High Security Registration Plate Online असं पेज आलं असेल. त्यानंतर खाली तुम्हाला ऑफीस सर्च सिलेक्ट करायचं आहे. आता तुमच्यासमोर तीन पर्याय आले असतील. पण तुम्हाला APPLY HSRP यावर क्लिक करायचं आहे.
04. त्यानंतर तुम्हाला Order HSRP यावर क्लिक करायचं... त्यानंतर तुम्हाला येथे गाडीचं Registration Number.. चेसीस नंबरचे शेवटचे पाच अंक ..इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक.. आणि मोबाईल नंबर टाकायचं आहे.. त्यानंतर पेमेंट करण्यासाठीचं पेज ओपन होईल.
इतर महत्वाच्या बातम्या
























