Pune Deenanath Mangeshkar Hospital: नाव सोनुबाई अन् हाती कथलाचा वाळा! दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सहा वर्षात इन्कम टॅक्सचा एकही रुपया भरला नाही
Pune: दहा लाखांसाठी गर्भवती महिलेवर उपचार नाकारून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा तब्बल 27 कोटींचा मिळकतकर थकविल्याचे समोर आले आहे.

Pune Deenanath Mangeshkar Hospital पुणे: पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संतापजनक प्रकरणामुळे सर्व स्थरातून रोष व्यक्त केला जात असताना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहा लाखांसाठी गर्भवती महिलेवर उपचार नाकारून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा तब्बल 27 कोटींचा मिळकतकर थकविल्याचे समोर आले आहे.
रुग्णालयाने सहा वर्षात इन्कम टॅक्सचा एकही रुपया भरला नाही
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गेल्या सहा वर्षात एकही रुपयाचा कर भरला नसल्याची माहिती पुढे आले आहे. त्यामुळे महापालिकेचा तब्बल 27 कोटींचा मिळकत कर रुग्णालय प्रशासनाने थकविल्याचे समोर आले आहे. रुग्णालय चालविणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने 2019-20 पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. एकीकडे पैशांसाठी उपचार नाकारणाऱ्या या रुग्णालयाने महापालिकेचा गेल्या सहा वर्षांपासून तब्बल 27 कोटी 38 लाख 62 हजार 874 रुपयांच कर थकवला आहे. एकीकडे धर्मदाय रुग्णालयांना मिळकतकर सवलत असल्याचा दावा केला जात असला, तरी महापालिकेने मात्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनकडे 27 कोटींची थकबाकी दाखविली आहे.
रुग्णालय प्रशासनावर अद्याप कारवाई का नाही?
पुढे आलेल्या माहितीनुसार, 2019-20 या वर्षापासून 2024-25 आर्थिक वर्षापर्यंतची ही मिळकतकराची थकीत रक्कम आहे. एकीकडे महापालिका काही लाखांची थकीत रक्कम असलेल्या मिळकतकर थकबाकीदारांवर कारवाई करत असताना मंगेशकर फाउंडेशनने एवढी मोठी रक्कम थकवली असताना अद्याप त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. याबाबत महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या प्रमुख, उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
रुग्णालयाचे ट्रस्टी सत्ताधाऱ्यांच्या जवळचे असावे, म्हणूनच..
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कुलूप लावून सरकारने रुग्णालयाकडून आपली जमीन परत घ्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात रुग्णालयाला जमीन दिली गेली, पंतप्रधानांच्या हस्ते याचे उदघाटन झाले व आता त्यांचे लोकं आंदोलन करत असल्याने वडेट्टीवारांनी प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे. रुग्णालयाचे ट्रस्टी सत्ताधाऱ्यांच्या जवळचे असावे, त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी चौकशी समिती फास असावा, अशी शंका देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















