Mutual Divorce : परस्पर सहमतीने घटस्फोट म्हणजे काय? भारतात याबाबत काय कायदा आहे ते जाणून घ्या
भारतात आजकाल घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. मात्र सध्या जगभरात Mutual Divorce चे प्रमाण देखील वाढत आहे. भारतात देखील Mutual Divorce होताना दिसत आहेत. विशेषतः बॉलिवूडमध्ये.
What Is Mutual Divorce : भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले आहे. विवाह म्हणजे दोन व्यक्तींचे, दोन कुटुंबाचे मिलन. परंतु प्रेमाचे व आपुलकीचे हे नाते कधी-कधी योग्य ती काळजी न घेतल्याने मानसिक व शारीरिक छळाचे कारण होते. भारतात आजकाल घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. मात्र सध्या जगभरात परस्परसंमतीने घटस्फोटाचे (Mutual Divorce) प्रमाण देखील वाढत आहे. भारतात देखील Mutual Divorce होताना दिसत आहेत. विशेषतः बॉलिवूडमध्ये अशी अनेक प्रकरणे पाहायला मिळतात. परस्पर घटस्फोट म्हणजे काय आणि भारतात त्यासंबंधी काय कायदा आहे हे सविस्तर जाणून घेऊयात.
Mutual Divorce म्हणजे काय?
Mutual Divorce हा एकमेकांपासून वेगळे होण्याचा अतिशय सोपा , साधा आणि शांत मार्ग आहे. या Mutual Divorce मध्ये पती-पत्नी काही अटी एकमेकांसोबत ठरवून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. काही वेळेस या पद्धतीच्या घटस्फोटात कोणत्याही प्रकारच्या अटी नसतात. तर एकतर्फी घटस्फोट खूप कठीण आणि गुंतागुंतीचा असतो. या घटस्फोटात विभक्त होण्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या परस्पर सहमतीने घेतलेला नसतो. यात केवळ पती-पत्नी या दोघांमधील एकाच जोडीदाराला विभक्त होण्याची आणि विवाह संपवण्याची इच्छा असते. भारतात परस्पर घटस्फोटाला सुमारे 1 ते 2 महिन्यांचा कालावधी लागतो.
भारतात घटस्फोटासंदर्भात काय नियम आहेत? (What Are The Rules Regarding Divorce In India?)
भारतात घटस्फोट मोठ्या प्रमाणात होत आहेत. भारतात विवाह आणि घटस्फोट करण्याचे विविध धर्माचे विविध मार्ग आहेत. जसे की, एखादा हिंदू धर्मातील व्यक्ती त्याच्या लग्नात समाधानी नसेल आणि त्याला घटस्फोट घ्यायचा असेल तर विवाह कायदा 1955 च्या अंतर्गत पती-पत्नी त्यांचं लग्न मोडू शकतात. तर दुसरीकडे ख्रिश्चन धर्मात ख्रिश्चन नागरिकांना भारतीय घटस्फोट कायदा 1869 नुसार पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात. न्यायालयाच्या आदेशानुसार घटस्फोट झाल्यानंतर जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करणं गरजेचे आहे. जसे की, पैसे देणाऱ्या जोडीदाराची आर्थिक स्थिती काय आहे? जोडीदाराच्या मागण्या काय आहेत? किती आहेत? ज्या व्यक्तीच्या मागण्या आहेत त्याचे उत्पन्न किती आहे? तर बर्याच प्रकरणांमध्ये, पतीच्या उत्पन्नाचा एक चतुर्थांश किंवा पत्नीच्या उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग दुसऱ्या भागीदाराला द्यावा लागतो.
इतर महत्वाच्या बातम्या