Sania Shoaib Divorce : शोएब-सानियाच्या घटस्फोटाची पुन्हा चर्चा; शोएब मलिकने सोशल मीडियाद्वारे दिले संकेत
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
Sania Mirza And Shoaib Malik Divorce : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक घटस्फोट घेणार का अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. गेल्या वर्षापासून या दोघांच्या घटस्फोटच्या बातम्या येत होत्या. सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाबद्दल मोठी चर्चा सुरू आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी 2010 मध्ये प्रेमविवाह केला होता. हैदराबाद येथे कुटुंब आणि नातेवाईकांच्या उपस्थित हा विवाह सोहळा झाला होता.
या दोघांच्या लग्नाच्या वेळी चाहत्यांमध्ये मोठा उत्साह होता. मात्र आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला मोठे उधाण आले आहे. पाकिस्तानमधील रिअॅलिटी टीव्ही शो 'द मिर्झा मलिक शो'साठी एकत्र दिसले होते. त्यावेळी या चर्चेला पूर्णविराम लागला होता. या शोमध्ये त्यांनी होस्टची भूमिका साकारली आणि पाकिस्तानातील प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या विशेष म्हणजे अनेकदा शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी या चर्चेला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
शोएबने नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये बदल केला आहे. त्यामुळेच घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आले आहे. शोएबने त्याच्या बायोमध्ये लिहिले होते की "@mirzasanar सुपरवुमन चा पती, एक पिता' असे त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये सुरुवातीपासून होते. पण आता शोएबने त्याचा इंस्टाग्राम बायो बदलला आहे. आता त्याने फक्त "एक पिता" असेच बायोमध्ये ठेवले असून सानियाचे नाव बायोमधून काढून टाकले आहे.
याआधी बातम्यांमध्ये शोएब मलिकने सानिया मिर्झाची फसवणूक केल्याचे बोलले जात होते. शोएब मलिकचे पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरसोबत अफेअर आहे. शोएब आणि आयशाचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. व्हायरल झालेल्या फोटोंबाबत अभिनेत्री आयशा म्हणाली होती की, हे एका जाहिरातीचे फोटो आहेत.
२०१० मध्ये केले होते लग्न
सानिया आणि शोएब मलिकने २०१० मध्ये लग्न केले होते. असे म्हटले जाते की लग्नापूर्वी दोघांनी एकमेकांना जवळपास 5 महिने डेट केले होते. लग्नानंतर 30 ऑक्टोबर 2018 रोजी शोएब आणि सानिया मुलगा इझानचे पालक झाले.
शोएब मलिकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
शोएब मलिकनं आतापर्यंत 25 कसोटी, 281 एकदिवसीय आणि 123 टी-20 सामन्यात पाकिस्तानच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये शोएबच्या नावावर 1 हजार 898 धावंची नोंद आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 7 हजार 423 धावांचा टप्पा गाठलाय. याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 2 हजार 435 धावा केल्या आहेत. शोएब 2008 मध्ये भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगचा भाग होता. त्यानं IPL च्या सात सामन्यात 52 धावा केल्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या