Mango For Diabetes Patient : मधुमेह रुग्ण आंबा खाऊ शकतात का? आंबा खाण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या सविस्तर
आरोग्य तज्ञांच्या मते, आंब्यातील नैसर्गिक साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. म्हणून आहारात मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी आंबा खाताना काळजी घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊयात सविस्तर.
Mango For Diabetes Patient : मधुमेह (Diabetes) हा आजकाल सगळ्यांना परिचित असा आजार आहे. रोजच्या धावपळीत जीवनशैलीत मोठे बदल होतात आणि मग आजार मागे लागतात. आजकाल मधुमेह हा आजार आहे जो कुटुंबातील एकाला तरी झालेलाच असतो. अगदी हातावर मोजण्याइतकी कुटुंबे असतील ज्यांच्या घरातील सदस्यांना हे मधुमेह नसतो. आंबा हे खरे तर आरोग्यासाठी फायदेशीर फळ मानले जाते. पण आरोग्य तज्ञांच्या मते, आंब्यातील नैसर्गिक साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. म्हणून आहारात मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी आंबा खाताना काळजी घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊयात सविस्तर.
मधुमेह रूग्णांनी आंबा खाणे योग्य आहे का? (Is Mango Suitable For Diabetic Patients?)
आरोग्य तज्ञांच्या मते, जर शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात असेल तरच तुम्ही आंबा (Mango) खावा नाहीतर आंबा खाणे पूर्णपणे टाळावे. मात्र मधुमेह असलेल्या रूग्णांनी मर्यादित प्रमाणात आंब्याचे सेवन केल्यास आजार बळावत नाही. एका आंब्यामध्ये सुमारे 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात आणि दररोज फळांमधील फक्त 30 ग्रॅम कार्बोहायड्रेट शरीरासाठी आवश्यक असतात. प्रत्येक आंब्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात गोडवा असतो. काही आंब्यांमध्ये इतर आंब्यांपेक्षा कमी गोडवा असतो, तर काहींमध्ये जास्त असतो. त्यामुळे मधुमेह रूग्णांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
आंबा खाण्याची योग्य पद्धत कोणती? (What Is The Right Way To Eat Mango?)
मधुमेह रूग्णांनी योग्य प्रमामात आंब्याचे सेवन केल्यास त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुमच्या रक्तातील साखर आणि पोटॅशियमचे प्रमाण मर्यादेत असेल तर तुम्ही आंबा खाऊ शकता. आंबा खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो सालीसकट खाणे गरजेचे आहे. यामुळे त्यात असणारे कार्बोहायड्रेट पचतात.
मधुमेह रूग्णांनी किती आंबे खावेत? (How Many Mangoes Should Diabetic Patients Eat?)
मधुमेह रूग्ण जेव्हा मँगो शेक किंवा मँगो ज्यूसच्या स्वरूपात आंबा खातात तेव्हा जास्त प्रमाणात सेवन करण्याचा धोका असतो. कारण एका ग्लास आंब्याच्या रसामध्ये अनेक आंबे वापरलेले असतात. मधुमेही रुग्णांनी रोज अर्ध्यापेक्षा जास्त आंबा खाणे टाळावे. जर तुमच्या रक्तातील साखर आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच आंब्याचे सेवन करा. मॉर्निंग वॉक नंतर, वर्कआउट केल्यानंतर आणि जेवणादरम्यान आंबा खाऊ शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या
Health Tips: सतत पाठदुखीचा त्रास जाणवतोय? तर घरीच सुरु करा 'हे' योगासन; त्वरित मिळेल आराम
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )