Weight Loss : जिम अन् डाएटशिवाय वजन कमी होते? 'या' अभिनेत्रीने 6 महिन्यात चक्क 15 किलो वजन कमी केले, जाणून घ्या
Weight Loss : 6 महिन्यांत 15 किलो वजन कमी करणे तिच्यासाठी आव्हान होते, पण वाढत्या वयातही वजन कमी करणे शक्य आहे. 40 नंतर वजन कमी करण्यासाठी निरोगी आणि प्रभावी टिप्स जाणून घ्या.
Weight Loss : असं म्हणतात ना की, वजन वाढवणे सोपे आहे, परंतु वजन कमी करणे तितकेच कठीण आहे. पण योग्य दिशेने प्रयत्न केले तर फार मोठी गोष्ट नाही. अभिनेत्री मोना सिंगने (Mona Singh Weight Loss) नुकतेच 6 महिन्यांत 15 किलो वजन कमी केले आहे. यामुळे अनेक चाहत्यांना प्रेरणा मिळाली आहे. तिने वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल विस्तृतपणे सांगितले आहे. तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात, अभिनेत्रीने असे काय केले? जाणून घेऊया तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल...
6 महिन्यांत 15 किलो वजन कमी केले
एका मुलाखतीदरम्यान मोनाने तिचा वजन कमी करण्याचा प्रवास सांगितला आहे. ती म्हणाली की, माझ्या वजन कमी करण्याच्या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा मी आनंद अनुभवला आहे. या प्रवासात मी सातत्य आणि शिस्तीकडे विशेष लक्ष दिले. या काळात तिने शारीरिक हालचालींवरही विशेष लक्ष दिले. वजन कमी करण्यासाठी मोनाने जिम सोडली आणि योगाची मदत घेतली. यावेळी त्यांनी योगासनांचा तिच्या दिनक्रमात समावेश केला. मोनाचे हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन तिच्या आगामी वेब सीरिजमधील भूमिकेसाठी असल्याचं तिने सांगितले.
अभिनयामुळे नाही तर वजन कमी करण्याच्या प्रवासामुळे चर्चेत
टेलिव्हिजन अभिनेत्री मोना सिंगने “जस्सी जैसी कोई नहीं” सारख्या इतर अनेक टीव्ही शोमध्ये तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मोना इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध आहे, आणि तिचा स्वतःचा चाहता वर्ग आहे. पण यावेळी मोना तिच्या अभिनयामुळे नाही तर तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामुळे चर्चेत आहे. 42 वर्षांच्या मोनाने हे सिद्ध केले आहे की, वाढत्या वयातही वजन कमी करता येते. फक्त यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल? जाणून घ्या..
30 नंतर वजन कमी करणे कठीण का होते?
वयाच्या 30 नंतर चयापचय मंदावतो आणि यानंतर वजन कमी करणे अत्यंत कठीण होते असे अनेकदा म्हटले जाते. हेल्थ शॉट्स वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार पोषण आणि आहारतज्ज्ञ डॉ. अदिती शर्मा यांनी विशेषत: वयाच्या 35 ते 40 नंतर, वाढत्या वयानुसार वजन कमी करण्याच्या काही टिप्स दिल्या आहेत. जाणून घ्या वजन कमी करण्याच्या काही खास टिप्स...
वयाच्या 40 नंतर वजन कमी करण्यासाठी हेल्दी टिप्स जाणून घ्या
अन्नाच्या प्रमाणात लक्ष द्या
वजन कमी करण्याच्या बाबतीत, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पौष्टीक आहार... जर तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे प्रमाण कमी केले नाही तर तुमचे वजन कमी होणार नाही. प्रत्येकाच्या कॅलरीच्या गरजा वेगवेगळ्या असतात, परंतु सर्वसाधारणपणे, जी स्त्री दिवसातून 2,000 कॅलरीज खाते, तिचे वजन कमी करण्यासाठी दिवसातून 1,500 ते 1,600 कॅलरीज कमी करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे.
इंटरमिटेंड फास्टिंग
अधूनमधून इंटरमिटेंड फास्टिंग करण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये 16:8 आहाराचा समावेश आहे, अभ्यासानुसार, अधूनमधून उपवास म्हणजेच इंटरमिटेंड फास्टिंग केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
फायबरचे प्रमाण
फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने तुम्ही दीर्घकाळ तृप्त राहता. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या अन्नाने तृप्त केले नाही तर त्याला वारंवार भूक लागते. त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढते आणि वजन नियंत्रित करणे कठीण होऊ शकते. “उच्च फायबरयुक्त पदार्थांमध्ये कॅलरीज कमी असतात, तरीही त्यामध्ये पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात असतात.
फायबर समृध्द अन्न देखील पचायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर गतीने वाढते आणि कमी होते. भाजीपाला, फळे, संपूर्ण धान्य, ब्राऊन राईस, पॉपकॉर्न, बीन्स, शेंगा, नट आणि बिया यांसह इतर वनस्पती-आधारित पदार्थांमधून तुम्ही फायबर मिळवू शकता.
प्रथिनांना प्राधान्य द्या
प्रथिने आपल्या शरीराची दुरुस्ती, संरक्षण आणि स्नायू ऊतक तयार करण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही पांढऱ्या पास्तासारखे कार्बोहायड्रेट खातात, तेव्हा ते ग्लुकोजमध्ये मोडतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे फॅट स्टोरेज होऊ शकते. म्हणून, आहारात प्रथिने पुरेशा प्रमाणात घ्या, ते चयापचय वाढवते, ज्यामुळे वजन कमी करण्याचा प्रवास सुलभ होण्यास मदत होते.
हेल्दी फॅटी फूड
मासे, अक्रोड आणि फ्लेक्ससीड्स यांसारख्या पदार्थांमधील ओमेगा -3 फॅटी ऍसिड आहे, जे शरीरासाठी हेल्दी आहे, शरीराला इन्सुलिन प्रतिरोधनाची अधिक शक्यता असते, ज्यामुळे निरोगी वजन राखणे अधिक आव्हानात्मक होते. त्यामुळे तुमच्या नियमित आहारात हेल्दी फॅटचा समावेश करा.
वर्कआउट रूटीन
वयाच्या 40 च्या आसपास स्नायूंचे वस्तुमान आणि कार्य कमी होण्यास सुरुवात होते, ही स्थिती सारकोपेनिया म्हणून ओळखली जाते. वजन कमी करण्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे. वेगाने चालणे, पोहणे किंवा सायकलिंग यासारख्या हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीत अॅक्टीव्हिटीजचा अवलंब केला जाऊ शकतो. यासोबतच योगाभ्यास करा, वजन कमी करण्यासाठी तसेच वाढत्या वयासोबत येणाऱ्या सर्व समस्यांवर हा एक आरोग्यदायी उपचार ठरू शकतो.
हेही वाचा>>>
Health : तुम्हालाही थकवा, केस गळणे यासह 'ही' लक्षणं असतील, तर तुमच्यात 'प्रोटीन' ची कमतरता आहे, आहारात या 5 पदार्थांचा समावेश करा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )