Lumpy Skin Disease : वाशिम जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढला, पशुपालक चिंतेत, लसीचं औषध उशिरा पोहोचल्यान धोका वाढला
वाशिम (Washim) जिल्ह्यातही लम्पी स्कीन आजारानं शिरकाव केला आहे. जिल्ह्यातील रिसोड (Risod) तालुक्यातील वाकद गावात सर्वाधिक जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लक्षणं दिसून आली आहेत.
Lumpy Skin Disease : सध्या राज्यातील पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कारण जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. दरम्यान, वाशिम (Washim) जिल्ह्यातही लम्पी स्कीन आजारानं शिरकाव केला आहे. जिल्ह्यातील रिसोड (Risod) तालुक्यातील वाकद गावात सर्वाधिक जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लक्षणं दिसून आलीआहेत.
लसीकरणाचे औषध उशिरा पोहोचल्यानं धोका वाढला
वाशिम जिल्ह्यातील जनावरांना लम्पी स्कीन या आजाराची लक्षणं दिसून आली आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पाळीव जनावरांवर लम्पी स्कीन आजराचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. रिसोड तालुक्यातील वाकद गावात सर्वाधिक जनावरांना लम्पी आजाराचे लक्षणे दिसून आली आहेत. तर जिल्ह्यात या आजारावर लागणारे लसीकरणाचे औषध उशिरा पोहोचल्यानं हा आजार मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत आता लसीकरण करण्यात येत असले तरी आता हा आजार आटोक्यात आणण्याचे आव्हान पशुसंवर्धन विभागावर असणार आहे.
राज्यातील 102 गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव
राज्यातील अनेक जिल्ह्यात लम्पी स्कीन प्रादुर्भाव झाला आहे. लम्पी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. राज्यातील 13 जिल्ह्यातील 102 गावांमध्ये याचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. या बाधित गावातील 997 पशुधनापैकी एकूण 628 पशुधन उपचाराने बरे झाले आहे. राज्यात प्रथम जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावात 4 ऑगस्टला लम्पी स्कीन रोगाची लागण झालेली जनावरे आढळून आली होती. त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला. सध्या राज्यातील अहमदनगर, अकोला, सातारा, बुलडाणा, उस्मानाबाद, अमरावती, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर, बीड आणि वाशिम या 13 जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा जनावरांवर प्रादुर्भाव झाला आहे. 102 गावातील जनावरांवर याचा प्रादुर्भाव झाला आहे. दरम्यान, बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिघातील 492 गावातील एकूण 1 लाख 57 हजार 696 पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. बाधित गावातील एकूण 997 बाधित पशुधनापैकी 628 पशुधन उपचाराने बरे झाले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. जळगाव जिल्ह्यात 10, अहमदनगर जिल्ह्यात एक तर पुणे जिल्ह्यात दोन अशा एकूण बाधित 13 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: