Agriculture News : पेरलेले बियाणे उगवलेचं नाहीत, वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कृषी अधिकारी कार्यलयावर अर्धनग्न आंदोलन
Agriculture News : पेरलेले बियाणे न उगवल्याने वाशिम (Washim) जिल्ह्यातील वाशीम तालुका कृषी अधिकारी कार्यलयावर अर्धनग्न आंदोलन केलं.
Agriculture News : पेरलेले बियाणे न उगवल्याने वाशिम (Washim) जिल्ह्यातील शेतकरी (Farmers) आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी वाशीम तालुका कृषी अधिकारी कार्यलयावर अर्धनग्न आंदोलन केलं. यामध्ये टो गावासह अडोळी गावातील शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी (sowing) केलेलं सोयाबीन न उगावल्यानं त्या संदर्भात कृषीकेंद्रा विरुद्ध तक्रार केली होती. या संदर्भात साधी विचारपूस न केल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी न्याय मिळावा या मागणीसाठी कृषी कार्यालयाच्या छतावर जाऊन अर्धनग्न आंदोलन केलं.
यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. दरम्यान, आंदोलनानंतर तरी कृषी विभाग कारवाई करेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. सध्या राज्याच्या काही भागात पाऊस सुरु आहे. तर काही भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेती कामांना चांगलाच वेग आला आहे. शेतकरी परेणीच्या कामाला लागले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहे. मात्र, काही शेतकऱ्यांचे पेरलेले बियाणे उगवले नाहीत. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. पेरलेले बियाणे न उगवल्यानं वाशीम जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयवर चढत अर्धनग्न आंदोलन केलं.
राज्यात आतापर्यंत 47 टक्के पेरण्या पूर्ण
सध्या राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे. तर अनेक भागात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं राज्यातील बळीराजा चिंतेत आहे. मोसमी पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक भागात खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. राज्यात आतापर्यंत 47 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. चालू आठवड्याअखेर पाऊस न झाल्यास कडधान्यांच्या लागवडीला फटका बसण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील कोकण सोडल्यास इतर भागात सर्वत्र सारखीच परिस्थिती असल्याचा चित्र राज्यभरात आहे. यावर्षी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आणि अल निनोच्या प्रभावामुळं मान्सून कमी असण्याची शक्यता निर्माण करण्यात आली आहे. अशातच उशिराने आलेल्या मान्सूनमुळं राज्यभरातील पेरण्यात खोळंबल्या आहेत. राज्यात आतापर्यंत फक्त 47 टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे.
कडधान्याच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती
उशिराने आलेल्या पावसामुळं तूर वगळता अन्य कडधान्यांची पेरणी जास्तीत- जास्त 20 जुलैपर्यंतच करता येणार आहे. त्यानंतर केलेली कडधान्यांची पेरणी फायदेशीर ठरणार नाही. आगामी काही दिवसात जर चांगल्या प्रकारचा पाऊस राज्यात झाला नाही तर यामुळं मात्र कडधान्यांच्या पेरणीला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळं कडधान्यांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम होण्याची भीती आता व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: