एक्स्प्लोर

Wardha News: हिंगणघाटमध्ये RSS चे वर्धा जिल्हा संघचालक राजपूत यांना तरुणांकडून मारहाण, एक जण ताब्यात

जेठानंद राजपूत हे वर्ध्यावरून बसने हिंगणघाटकडे प्रवास करत होते. बसमध्ये एका दाम्पत्याचा वाद सुरु असताना जेठानंद राजपूत हे मध्यस्ती गेले असता वादातील संबंधित युवकांने वाद घातला.

वर्धा : वर्ध्याच्या (Wardha News) हिंगणघाटमध्ये तरुणांकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. जेठानंद राजपूत असं त्यांचं नाव असून ते आरएसएसचे वर्धा जिल्हा संघचालक असल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी (Hinghanghat Police Station)  एकाला ताब्यात घेतलंय. वर्ध्यावरून बसने प्रवास करत असताना बसमधल्या युवकांनी हिंगणघाटच्या नांदगाव रस्त्यावर जेठानंद राजपूत यांना बसमधून खाली उतरवून मारहाण केली. या घटनेनंतर हिंगणघाट शहरात रात्री तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून आरोपीवर कारवाईची मागणी केली. प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत एका आरोपीला ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरु आहे.

आठ ते दहा जणांनी मारहाण केली (Wardha Crime News) 

जेठानंद राजपूत हे वर्ध्यावरून बसने हिंगणघाटकडे प्रवास करत होते. जेठानंद राजपूत हे RSS चे वर्धा जिल्हा संघचालक होते.    बसमध्ये एका दाम्पत्याचा वाद सुरु असताना जेठानंद राजपूत हे मध्यस्ती गेले असता वादातील संबंधित युवकांने वाद घातला. सोबतच त्याच्या मित्रांना हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्त्यावर  बोलावत नांदगाव येथे बस थांबवून जेठानंद राजपूत यांना बसखाली उतरवून आठ ते दहा जणांनी मारहाण केली आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून  संपूर्ण घटनेचा आढावा घेत आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. हिंगणघाट शहरात  पोलिसांची कुमक बोलवत वातावरण शांत करण्यात आले.

रात्री शहरात  तणावपूर्ण वातावरण निर्माण

घटनेनंतर सोशल मीडियावर काही संदेश व्हायरल करण्यात आले. याबाबत सुद्धा पोलिसांकडून (Police) माहिती घेतली जातं आहे. सायबर टीम रात्रीपासून हिंगणघाट शहरात सोशल मीडियावर भडकवणारे संदेश पाठविणाऱ्यांचा शोध घेत आहे. रात्री शहरात  तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी परिस्थिती हाताळली.  संबंधितांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या घटनेनंतर  हिंगणघाटेमध्ये तणावाचे वातावण निर्माण झाले होते. परंतु सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. 

हे ही वाचा :               

वर्धा नागरी सहकारी बँक खात्यांवरील सायबर हल्ल्याचा छडा, नायजेरियन नागरिकासह पाच आरोपी अटकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget