एक्स्प्लोर

देशात भीतीचे वातावरण, 24 लाख हिंदू कुटुंब देश सोडून गेले; प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

Prakash Ambedkar : तिसऱ्यांदा भाजपचे सरकार आल्यास ईडी व्यापाऱ्यांचा बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही. पुढे तर तुमच्यासाठी लढायला देखील माणसे शिल्लक राहणार नाही.

वर्धा : देशात भीतीचे वातावरण असून दडपशाही सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. "दमदाटीच्या वातावरण याची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) आज थेट आवाहन देतो, आम्ही जे आकडे सांगतो ते खोटे आहे का ते सांगा. 24 लाख कुटुंब हे भारताचे नागरिकत्व सोडून गेले, ज्यांची मालमत्ता 100 कोटीच्या आसपास आहे. यात मुसलमान नाही, ख्रिश्चन नाही, हे 24 लाख कुटुंब सर्व हिंदू आहे, असं आंबेडकर म्हणाले. वर्धा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. 

पुढे बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "वर्ध्यात असणाऱ्या सभेला महाएल्गार नाव दिलं आहे. याचं कारण एका बाजूला दडपशाही चालली आहे. महाविकास आघाडीमधून निरोप येतो तुम्हाला अशोक चव्हाण यांच्याशी बोलायचं आहे. आता ते अशोक चव्हाणच गायब, मग बोलायचे कुणाशी. ही दडपशाही आहे. पण कुटुंबाला जेलमध्ये जाण्यापासून वाचवा म्हणून, जे काही आरएसएस, बिजेपीचे सरकार धमकवते, ब्लॅकमेल करत आहे. कुटुंबाला वाचवायला जा पण जाताना एक निर्णय करा, लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला लोलवल्याशिवाय राहणार नाही हा निश्चय करा, असेही आंबेडकर म्हणाले. 

भाजपचं सरकार आल्यावर व्यापाऱ्यांच्या नंबर...

पुढे बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "इथला व्यापारी जो आहे, त्याला मी आगा करतो, चेतावणी देतो. आता सर्व राजकीय नेत्यांच्या नंबर लागला आहे, धाडी घालण्याचा. यानंतर व्यापाऱ्यांचा नंबर आहे. तिसऱ्यांदा भाजपचे सरकार आले तर ईडी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. व्यापाऱ्यांचा नंबर लागणार आहे, पुढे तर तुमच्यासाठी लढायला देखील माणसे शिल्लक राहणार नाही. जे आज राजकिय नेत्यांचे झाले ते व्यापाऱ्यांचे होऊ नये याची खबरदारी व्यापाऱ्यांनी घेतली पाहिजे, तिसऱ्यांदा भाजपला निवडून येऊ देऊ नका, असे आंबेडकर म्हणाले. 

अन्यथा दिल्लीत दिसणारी आराजकता गल्लीत पोहचेल 

आता कुणीही कुणाचं वर्चस्व स्वीकारायला तयार नाही, बरोबरीने वागा, हाताच्या बाहेर परिस्थिती गेली तर ठोकल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी सुद्धा म्हणतो की, अश्रूधुर सोडायच्या सोडा, पण यापुढे गेले तर सोडणार नाही. या देशात अराजकता आली आहे. आयाराम गायारामच्या भरवश्यावर कारभार देशात सुरु आहे. आज राजकारणातल पाणी पूर्ण गढूळ झाल आहे. यामुळे त्यात नवीन पाणी टाकून फायदा नाही, पाणीच बदलाव लागेल. त्यामुळे यावेळी जाती, नातेवाईक यांना प्राधान्य दिल्यास दिल्लीत दिसणारी आराजकता गल्लीत पोहचेल. राजकारण्यांचा उन्माद वाढले आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री बोलतात की, आंदोलन कराल तर कारवाई होईल. आंदोलन ही समस्या मांडण्याचा माध्यम आहे.  ते सुद्धा तुम्ही बाटलीत बंद करण्याचं ठरवल आणि उद्या ती बाटली फुटली तर सांभाळणार कोण, असा खोचक टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Prakash Ambedkar: मनोज जरांगे पाटील यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik on Abu Azmi : फटीचर झालो तरी हात पसरत नाही,मलिक आझमींवर भडकलेAaditya Thackeray Bike Rally : प्रचाराचा शेवटचा दिवस, आदित्य ठाकरेंची भव्य बाईक रॅलीPratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलकVinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Embed widget