एक्स्प्लोर

रक्तापलिकडची नाती... 23 वर्षीय चैतन्यमुळे करणला जीवनदान, 30 लाखांच्या उपचार खर्चासाठी देवाभाऊंची मदत

करणच्या उपाचरासाठी 30 लाख रुपये खर्च ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. जेंव्हा काही करण्याचं वय होत तेंव्हा अचानक आयुष्याच्या उंबरठ्यावर तो उभा राहिला होता.

मुंबई : आजच्या काळात नाती फक्त कागदावर उरली आहेत, माणुसकी हरवली आहे, हे आपण वारंवार अनुभवतो. प्रॉपर्टीसाठी, पैशासाठी सख्खे भाऊ कोर्टकचऱ्यात जातात, एकमेकांवर हात उचलतात. पण याच समाजात कधी तरी अशी एखादी घटना घडते की, आपण पुन्हा एकदा विश्वास ठेवतो की अजूनही माणुसकी (Humanity) जिवंत आहे, नाती अजूनही जपली जातात, त्याग अजूनही मोठा आहे. हिंगणघाटमध्ये (Hinganghat) अशीच एक प्रेरणादायी आणि हृदयाला भिडणारी घटना घडली. येथील 15 वर्षीय करण गजानन ठाकरे हा सर्वसामान्य घरातील मुलगा. वडील नाहीत, दोन बहिणींची लग्नं नुकतीच झाली. घराचा भार त्याच्या खांद्यावर. पण, अचानक आलेल्या गंभीर आजाराने त्याचं आयुष्य अंधारमय झालं. लिव्हर निकामी झालं आणि करणला “यकृत प्रत्यारोपणाशिवाय काहीही पर्याय नाही”, असे डॉक्टरांनी (Doctor) स्पष्ट शब्दांत सांगितलं. यकृत कोण देणार, प्रत्यारोपणाचा 30 लाख खर्च कुठून करायचा, असे अनेक प्रश्न ठाकरेंपुढे उभे होते.

करणच्या उपाचरासाठी 30 लाख रुपये खर्च ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. जेंव्हा काही करण्याच वय होत तेंव्हा अचानक आयुष्याच्या उंबरठ्यावर तो उभा राहिला होता. आईचे आजारपण होते. तरि विवाहित असूनही बहिणी जीव टाकायला तयार होत्या. पण, वैद्यकीय कारणांनी त्यांचं यकृत घेणं शक्य नव्हतं. लग्न झालेलं असल्याने त्यांना अनेक अडचणी सुद्धा होत्या. हा सर्व त्रास त्याच्यापेक्षा वयाने 3 वर्षे लहान असलेला चैतन्य पाहत होता. पुण्यात हॉस्पिटलमध्ये ने आण करणे आणि बहिणींची तडफड सर्व चैतन्य पाहत होता. तेव्हा, चैतन्यने करणच्या बहिणींना सांगितलं की तुमचं लग्न झालं आहे. तुम्ही अस काही करू नका. मी, माझं यकृत देतो. करणला हॉस्पिटलला घेऊन जाणे तपासणी करणे सर्व चैतन्यने केल. करणचा मावसभाऊ 22 वर्षीय चैतन्य बगाडे याच रक्ताचं नातं नव्हतं, पण त्याने एक क्षणही न घालवता ठामपणे सांगितलं “करणला मी माझं यकृत देतो.” हा निर्णय म्हणजे स्वतःच्या आयुष्याशी खेळणं होतं. पण त्यागाची ही तयारी पाहून आजचा समाज थक्क झाला. चैतन्यने दाखवून दिलं की खरी नाती रक्ताने नाही, तर माणुसकीने आणि त्यागाने जपली जातात.

चैतन्यने यकृत देण्याचं मान्य केलं, मात्र अजून एक मोठा प्रश्न होता 30 लाख रुपयांचा खर्च. गरीब घरासाठी ही रक्कम स्वप्नासारखीच होती. पण हिंगणघाटच्या भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय मदत कक्षाशी रामेश्वर नाईक यांच्याशी संपर्क साधला. ही हृदयस्पर्शी कहाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर गेली. “22 वर्षांचा तरुण स्वतःचं यकृत देऊन भावाला जीवनदान देतोय” हे ऐकताच ते स्वतः पुढे सरसावले. त्यांनी आदेश दिला की करणच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय मदत कक्ष घेईल, हॉस्पिटलला तसे कळविण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस आणि  सहायता निधीची मोठी मदत (chief minister)

पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल, डेक्कन येथे शस्त्रक्रियेची तयारी झाली. हॉस्पिटलने 30 लाखांचा अंदाज दिला होता. त्यापैकी नातेवाईकांनी 5 लाख भरले, मुख्यमंत्री सहायता निधीतून 2 लाख दिले गेले आणि उर्वरित 23 लाख धर्मादाय मदत कक्षातून उचलले गेले. त्यामुळे करणसारख्या सर्वसामान्य घरच्या मुलालाही 30 लाखांची आधुनिक शस्त्रक्रिया मोफत झाली. ऑपरेशन थिएटरमध्ये तासन्‌तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. करणच्या शरीरात चैतन्यचं यकृत रोवण्यात आलं आणि डॉक्टरांनी दिलासा दिला “ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी आहे.” करण आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला. रुग्णालयातून बाहेर पडताना त्याने हात वर करविजयचिन्ह दाखवलं. त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे, एका मावसभावाचा त्याग आणि एका मुख्यमंत्र्यांची संवेदनशील मदत होती. ही सत्यकथा समाजासाठी मोठा धडा आहे. कारण नाती जिवंत ठेवायची असतील, तर त्याग करावा लागतो. शेजारी, मित्र, नातलग संकटात असतील, तर त्यांच्यासाठी पुढे सरसावलं पाहिजे. शासनाच्या योजना आहेत, पण त्या योग्यवेळी पोहोचवल्या तरच त्या जीवदान देतात. चैतन्यसारखा तरुण आणि देवेंद्र फडणवीसांसारख संवेदनशील नेत समाजात असेपर्यंत माणुसकी कधीच मरणार नाही. आज करण जिवंत आहे, कारण त्याचा मावसभाऊ रक्ताचं नातं न जरी असलं तरी माणुसकीचं नातं निभावून गेला. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या आयुष्याला संजीवनी दिली. एकीकडे “सख्खे भाऊ प्रॉपर्टीसाठी भांडतात, पण या मावसभाऊने स्वतःचं यकृत देऊन जीवदान दिलं.

हेही वाचा

पुढचं स्टेशन बीड... तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती; 16 स्थानके, 261 किमी मार्ग, पहिल्या रेल्वेची उत्सुकता, काय आहे इतिहास?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
Embed widget