एक्स्प्लोर

Vikrant Massey : 'बालिका वधू'चा श्याम कसा झाला '12 वी फेल'चा IPS मनोज शर्मा; वाचा विक्रांत मेस्सीची स्ट्रगल स्टोरी

Vikrant Massey : '12 वीं फेल' या चित्रपटाच्या माध्यमातून लोकप्रियता मिळालेला अभिनेता विक्रांत मेस्सी आता 37 वर्षांचा झाला आहे. गेल्या 14 वर्षांपासून तो मनोरंजनसृष्टीत सक्रीय आहे. '12 वी फेल' (12th Fail) चित्रपटात त्याने साकारलेली IPS मनोज शर्मा (IPS Manoj Sharma) ही भूमिका चांगलीच गाजली.

Vikrant Massey : विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांचा '12 वीं फेल' (12th Fail) हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटातील कलाकार आणि त्यांच्या अभिनयाचं आजही सर्वत्र कौतुक होतं. '12 वीं फेल' या चित्रपटातील विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) याच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. सर्वसामान्य नागरिकांसह सिनेपरिक्षकांनीही या चित्रपटाची प्रशंसा केली. 'फिल्मफेअर 2024'मध्ये या चित्रपटाल बेस्ट अॅक्टर क्रिटिक्स पुरस्कार मिळाला. '12 वीं फेल' या चित्रपटामुळे 'बालिका वधू' (Balika Vadhu) मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या विक्रात मेस्सीला चांगलीच लोकप्रियता मिळाला. त्याने आयपीएस मनोज शर्मा (IPS Manoj Sharma) यांची भूमिका साकारली होती. विक्रांतचा छोट्या पडद्यापासून सुरू झालेला प्रवास आज रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचला आहे. '12 वीं फेल' या चित्रपटाआधी विक्रांत मेस्सीने अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या कामाचं आजही कौतुक होतं.

विक्रांत मेस्सीचं फिल्मी करिअर कसं होतं? (Vikrant Massey Career)

'12 वीं फेल' या चित्रपटात विक्रांत मेस्सीने मनोज शर्मा यांच्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय दिला आहे. विक्रांतच्या दर्जेदार अभिनयाची झलक प्रेक्षकांना 'मिर्जापूर' या गाजलेल्या वेबसीरिजमध्येही पाहायला मिळाली होती. या सीरिजमध्ये त्याने साकारलेली बब्लू पंडितची भूमिका चांगलीच गाजली. दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) 'छपाक' या सिनेमातही तो दिसला होता. अभिनेत्याने जास्तीत जास्त गंभीर भूमिका साकारल्या आहेत. 'ब्रोकन बट ब्यूटीफुल' या सीरिजमध्ये त्याचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला होता. या सीरिजमधील अनेक सीन्स आजही सोशल मीडियावर व्हायरल होतात. 'हसीना दिलरुबा','फॉरेंसिक','प्लस','14 फेरे' आणि 'लव्ह हॉस्टल' सारख्या अनेक कलाकृतींमध्ये विक्रांतचं कमाल काम पाहायला मिळालं आहे. पण त्याचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडले.

विक्रांत मेस्सीची स्ट्रगल स्टोरी

विक्रांतने 14 वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरील 'धूम मचाओ धूम' या मालिकेच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. त्याची हा कार्यक्रम जास्त चालला नाही. त्यानंतर एका वर्षाने 2008 मध्ये विक्रांतला मोठा ब्रेक मिळाला. एकीकडे विक्रांतला 'बालिका वधू'साठी कास्ट केलं गेलं. या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. या मालिकेत त्याने श्यामची भूमिका साकारली होती. विक्रांतच्या करिअरमधला हा आयकॉनिक रोल होता. 

छोटा पडदा गाजवलेला विक्रांत मेस्सी!

बालिका वधू या मालिकेनंतर विक्रांत मेस्सीने कबूल या मालिकेत काम केलं. मिर्जापूरसह क्रिमिनल जस्टिसमध्येही त्याने काम केलं आहे. पुढे '12 वीं फेल' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याला मोठा ब्रेक मिळाला. स्ट्रगलच्या काळात विक्रांतसोबत मैत्री करायला कोणीही तयार नव्हतं. विक्रांतच्या पत्नीचं नाव शीतल ठाकूर आहे. विक्रांतच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे.

संबंधित बातम्या

The Sabarmati Report teaser : तो अपघात नव्हता... विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'चा टीझर लाँच, गोध्रा प्रकरणावर आणखी एक चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget