(Source: ECI/ABP News/ABP Majha)
The Sabarmati Report teaser : तो अपघात नव्हता... विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'चा टीझर लाँच, गोध्रा प्रकरणावर आणखी एक चित्रपट
The Sabarmati Report teaser : गोध्रा प्रकरणाशी संबंधित असलेला द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला . विक्रांत मेस्सी यात प्रमुख भूमिकेत आहे.
The Sabarmati Report teaser : 12th Fail चित्रपटात कसदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आपली जादू दाखवण्यास सज्ज झाला आहे. विक्रांतच्या या नव्या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) या चित्रपटात विक्रांत मेस्सी झळकणार आहे. हा चित्रपट 'गोध्रा रेल्वे जळीतकांड' प्रकरणावर आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या टीझरमध्ये विक्रांत न्यूज अँकरच्या अर्थात वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत दिसत आहे. यावेळी रेकोर्डिंग करत असल्याचे दृष्य आहे. त्याच्या टेलिप्रॉम्पटरवर 'गोध्रा अपघातामध्ये.. 'अशी ओळ येते. त्याला तोडत वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत असलेला विक्रांत मेस्सी हा गोध्रा येथील घटना अपघात नव्हती असे म्हणताना दिसत आहे.
'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाची कथा ही गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ 27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळी साबरमती एक्सप्रेस जाळण्यात आली होती. या घटनेचे गुजरात आणि देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम झाले.
View this post on Instagram
कधी प्रदर्शित होणार द साबरमती रिपोर्ट? The Sabarmati Report Release Date
द साबरमती एक्स्प्रेस हा चित्रपट 3 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन चंडेल यांनी केले आहे. चित्रपटात विक्रांत मेस्सीसोबत राशी खन्ना, रिद्धी डोग्रा आदींच्या भूमिका आहेत. एकता कपूर, शोभा कपूर, अमूल मोहन आदींनी निर्मिती केली आहे.
अनेकांनी गमावले होते प्राण...
27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळच्या सुमारास गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यात आली. साबरमती एक्स्प्रेसला लावण्यात आलेल्या घटनेत 59 कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. हे कारसेवक अयोध्येवरून परतत होते. या घटनेनंतर गुजरातमध्ये भीषण दंगल उसळली होती. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. साबरमती एक्स्प्रेसला लावण्यात आलेल्या आगीच्या प्रकरणी दोन चौकशी आयोग नेमण्यात आले होते.
रेल्वे जळीतकांड प्रकरणी 31 जण दोषी
2006 मध्ये, बॅनर्जी आयोगाच्या अहवालाने हा अपघात असल्याचे घोषित केले, परंतु गुजरात उच्च न्यायालयाने ते निष्कर्ष नाकारले. सुमारे दोन वर्षांनंतर, नानावटी-मेहता आयोगाच्या अहवालात, जमावाने केलेल्या पूर्वनियोजित कटाचा परिणाम म्हणून रेल्वे जाळण्यात आल्याचे म्हटले गेले. कोर्टाने या प्रकरणात 2011 मध्ये या आधारे 31 जणांना दोषी ठरवले होते.