Vat Purnima 2024 : यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी जुळून आले 4 दुर्मिळ योग; सुवासिनींना मिळणार व्रताचा दुप्पट लाभ
Vat Purnima 2024 : यंदा वटपौर्णिमा 21 जून रोजी आहे, या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केला जातो. यंदा वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ योग जुळून आले आहेत, ज्याचा अधिकाधिक फायदा विवाहित महिलांना होणार आहे.
Vat Purnima 2024 : ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा म्हणजेच वट पौर्णिमा (Vat Purnima 2024). या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी उपवास केल्याने महिलांना सौभाग्य प्राप्त होतं, पतीचं वय वाढतं. या व्रताच्या प्रभावाने आपल्या हातून नकळत घडलेली पापंही नष्ट होतात. यंदा वटपौर्णिमा 21 जूनला आहे, या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे, ज्याचा विवाहित महिलांना अफाट लाभ मिळणार आहे.
वटपौर्णिमा 2024 शुभ मुहूर्त (Vat Purnima 2024 Shubh Muhurta)
वटपौर्णिमा 21 जूनला आहे, या दिवशी वडाच्या झाडाला पूजण्यासाठी सकाळी 7 वाजून 31 मिनिटांपासून ते सकाळी 10 वाजून 38 मिनिटांपर्यंतचा शुभ मुहूर्त असणार आहे.
वटपौर्णिमा 2024 शुभ योग (Vat Purnima Vrat 2024 Shubh yoga)
वटपौर्णिमेच्या दिवशी शुभ योग, त्रिग्रही योग, बुधादित्य योग, शुक्रादित्य योग यांचा संयोग होत आहे. या 4 शुभ काळात पूजा केल्याने विवाहित स्त्रीला अधिक पुण्य प्राप्त होतं.
- शुभ योग (21 जून 2024, संध्याकाळी 06.42 वाजेपर्यंत)
- शुक्रादित्य योग
- बुधादित्य योग
- त्रिग्रही योग
विवाहित महिला वट सावित्री व्रत का पाळतात? (Vat Purnima Vrat Significance)
पौराणिक कथेनुसार, सावित्रीने तिच्या तपश्चर्येच्या आणि पवित्रतेच्या सामर्थ्याने मृत्यूचा स्वामी भगवान यमाला तिचा पती सत्यवानचं जीवन परत करण्यास भाग पाडलं, म्हणून विवाहित महिला आपल्या पतीच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत पाळतात.
वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेची पद्धत
ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी ज्या महिलांनी उपवास ठेवला आहे, त्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतरच व्रताची सुरुवात करावी. तसेच, या दिवशी श्रृंगार करावा. पूजेचं साहित्य तयार करावं. त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाला, फुले, वाण, पाणी देऊन त्याभोवती फेरे घालावे. आणि पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
वडाच्या झाडाला सूत का गुंडाळतात?
धार्मिक मान्यतेनुसार, वटवृक्षाच्या खोडात असलेल्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. वट पौर्णिमेच्या पूजे दरम्यान, जेव्हा महिला वटवृक्षाच्या खोडाला सूत गंडाळतात त्यावेळी जिवाभावाने खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी आणि आग या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात. अशी मान्यता आहे. त्यामुळे वटपौर्णिमेला वटवृक्षाला सूत गुंडाळले जाते अशी मान्यता आहे.
हेही वाचा: