एक्स्प्लोर

Vat Purnima 2024 : वाट पाहते पुनवेची! वटपौर्णिमेच्या दिवशी 'या' चुका करणं टाळा; वाचा पूजेची योग्य पद्धत

Vat Purnima 2024 : दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची अगदी मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

Vat Purnima 2024 : ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा (Vat Purnima) या नावाने ओळखली जाते. या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची अगदी मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पण, आपल्यापैकी अजूनही असे बरेच जण आहेत ज्यांना या दिवलाचं पारंपरिक महत्त्व आणि त्यामागची कथा नेमकी काय आहे हे माहीतच नाही. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त (Vat Purnima 2024 Shubh Muhurta)

वडाच्या झाडाला पूजण्यासाठी 21 जून रोजी सकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत असणार आहे.

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का केली जाते?

पौराणिक कथेनुसार, देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवी सावित्रीच्या पवित्रता आणि पतिव्रता पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले. याबरोबरच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरण पावणार नाही तो दीर्घायुष्य जगेल, असे वरदान त्यांनी दिले. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.

वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका 

  • वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला इजा करू नये, त्याची फांदी तोडू नये. जर तुम्ही वटवृक्षाच्या फांदीची पूजा करणार असाल तर एक दिवस आधी म्हणजे आजच फांदी तोडून घरी आणा.
  • वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. कारण, या दिवशी काळ्या रंगाचे तसेच निळ्या रंगाचे कपडे परिधान करणं अशुभ मानले जाते. तसेच, विवाहीत महिला या दिवशी लाल, हिरवा, पिवळा अशा शुभ रंगाच्या साड्या परिधान करू शकतात.  
  • वटपौर्णिमेच्या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान करू नका. या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. 
  • गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Vat Purnima 2024 : पती सत्यवानासाठी सावित्रीने केलं वटसावित्रीचं व्रत; जाणून घ्या वटपौर्णिमेची पारंपरिक कथा आणि महत्त्व

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 23 October 2026: आज शुक्रवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज शुक्रवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Guru Ketu Yuti 2026 : धनत्रयोदशी-दिवाळीच्या आधीच जुळून येणार 'ध्वज योग'; या 4 राशींचा सुवर्णकाळ लवकरच सुरु, मागाल ती इच्छा होणार पूर्ण
धनत्रयोदशी-दिवाळीच्या आधीच जुळून येणार 'ध्वज योग'; या 4 राशींचा सुवर्णकाळ लवकरच सुरु, मागाल ती इच्छा होणार पूर्ण
Chanakya Niti : चाणक्य नीतीचे 'हे' 10 विचार आचरणात आणा; आयुष्यात कधीच पराभव होणार नाही
चाणक्य नीतीचे 'हे' 10 विचार आचरणात आणा; आयुष्यात कधीच पराभव होणार नाही
Ketu Gochar 2026 : दिवाळीनंतर केतू ग्रहाच्या चालीने पालटणार तब्बल 6 राशींचं नशीब; मागाल ती इच्छा होणार पूर्ण, वाचा तुमची लकी रास
दिवाळीनंतर केतू ग्रहाच्या चालीने पालटणार तब्बल 6 राशींचं नशीब; मागाल ती इच्छा होणार पूर्ण, वाचा तुमची लकी रास

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Embed widget