Vaibhav Naik: कोकणात ठाकरे गटाला आणखी एक धक्का; वैभव नाईक अन् स्नेहा नाईक यांना एसीबीची नोटीस
Vaibhav Naik: ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावली आहे.

Vaibhav Naik: कोणकणात शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group) आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नोटीस बजावली आहे. वैभव नाईक यांच्यासह त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक यांना रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडून नोटीस बजावण्यात आली आहे. याआधी ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांच्यामागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमीरा लागला आहे. तसेच राजन साळवी देखील ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात कोकणात ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याची सांगितले जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीसमध्ये वैभव नाईक आणि स्नेहा नाईक यांना चौकशीसाठी 11 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याआधी देखील वैभव नाईक यांची मालमत्ता प्रकरणी चौकशी झाली होती. वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा यांचे HUF व नाईक स्टोन इंडस्ट्रीजचे ०१/०१/२००२ ते २९/०९/२०२२ या कालावधीतील उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबतची परिपुर्ण माहिती तसेच या कालावधीत आयकर विवरणपत्रे, ऑडीट रिपोर्ट, कॉम्प्युटेशन ऑफ इनकम, शेडयुल बॅलन्सशीट, प्रॉफीट अॅन्ड लॉस अकाऊंट डिटेल्स शेडयुल व त्यासंबधीत कागदपत्रांसह 11 फेब्रुवारी ला उपस्थित राहण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय?
उपरोक्त संघर्भाधीन विषयान्वये आपणांस कळविण्यात येते की, आपले मालमत्तेच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून उघड चौकशी क्रमांक ०१/२०२२ करण्यात येत आहे. सदर उघड चौकशीच्या अनुषंगाने आपण दिनांक ०५/१२/२०२२ रोजी लाप्रवि कार्यालय रत्नागिरी येथे आपली पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांचेसह उपस्थित राहिला. परंतु लोकप्रतिनिधी कालावधीतील आपली मालमत्ता, उत्पन्न व खर्च याबाबत परिपूर्ण माहिती त्यावेळी उपलब्ध नसल्याने सदर माहिती आपण मागाहून सादर करणार असलेबाबत समक्ष सांगितल्याने तसा त्यावेळी प्राथमिक स्वरुपात आपला जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर उपरोक्त संदर्भ कः १२ चे पत्रान्वये सदर उघड चौकशीच्या अनुषंगाने मत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्ममधील माहिती व आवश्यक कागदपत्रांसह अनुक्रमे दि०३/०१/२०२३ रोजी आणि दि. २८/०६/२०२३ रोजी उपस्थित राहाणेबाबत आपणास या कार्यालयाकडून कळविण्यात आले होते. मात्र आपण उपस्थित न राहता दिनांक २८/०६/२०२३ रोजी आपले अकाउटंट श्री अमोल पुरुषोत्तम केरकर हे उपस्थित राहिले. परंतु त्यांनी आमालेली कागदपत्रे परिपुर्ण नसल्याने ती न देता, काही कालावधी नंतर आपले उपस्थितीत सदरची कादगपत्रे हजर करु असे पत्र त्यांनी या कार्यालयास दिलेले आहे. परंतु त्यानंतर आपलेकडून कागदपत्रांबाबत पुर्तता झालेली नाही. अगर आपण उपस्थित राहिले नाहीत. तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून आपले मालमत्तेच्या सुरु असलेल्या उघड चौकशीचे अनुषंगाने आपले स्वतःचे, आपली पत्नी सौ. स्नेहा यांचे तसेच HUF व नाईक स्टोन इंडस्ट्रीज यांचे दिनांक ०१/०१/२००२ ते २९/०१/२०२२ मा कालावधीतील उत्पन्न, अर्थ व मालमत्ताबाबतची आवश्यक ती परिपूर्ण माहिती आपणास या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या मत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्ममध्ये भरुन तसेच सदर कालावधीतील आयकर विवरणपत्रे, ऑडीट रिपोर्ट, कॉम्प्युटेशन ऑफ इनकम, शेडमूल बॅलन्समीट, प्रॉफीट अॅन्ड लॉस अकाऊंट डिटेल्ला शेडयुल व त्यासंबधीत कागदपत्रांसह आपण दिनांक ११/०२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय नाचणे रोड, मास्ती मंदीर येथे उपस्थित रहावे.
संबंधित बातमी:
Rajan Salvi: राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

